December 14, 2024

योनेक्स सनराईज ईगल आय सोल्युशन टाइम अटॅक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेस ३ जुलै पासून प्रारंभ

पुणे, 22 जुलै 2024: पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या वतीने योनेक्स सनराईज ईगल आय सोल्युशन टाइम अटॅक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा पी.ई. सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्टस कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथे 3 ते 4 ऑगस्ट 2024 या कालावधीत रंगणार आहे.

स्पर्धेचे मिहिर रातंजनकर यांनी सांगितले की, पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या यांच्या मान्यतेखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, ही बॅडमिंटन मधील नवीन प्रकार असणारी स्पर्धा 15,17,19 वर्षाखालील मुले व मुली, वरिष्ठ गट, 30वर्षांवरील, 35वर्षांवरील, 40 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील गटात होणार आहे.

स्पर्धेत नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख 31जुलै 2024आहे. नावनोंदणीसाठी https://pdmba.zeetius.com/Web/TournamentRegistration या सांकेतिक स्थळावर भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.