October 3, 2024

योनेक्स सनराईज व्हीव्ही नातू मेमोरियल अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष चेंगप्पा, स्तुती अग्रवाल, प्रशंसा बोनम, इशू मलिक यांचा मुख्य फेरीत प्रवेश

पुणे, 10 जुलै 2024: पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या वतीने योनेक्स सनराईज व्हीव्ही नातू मेमोरियल अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत पात्रता फेरीत लक्ष चेंगप्पा एमए याने तर, महिला गटात स्तुती अग्रवाल, प्रशंसा बोनम, इशू मलिक यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला.

पी.ई. सोसायटीज पीडीएमबीए स्पोर्टस कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर, सीओईपी बॅडमिंटन कोर्ट, पीवायसी हिंदू जिमखाना बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात पाचव्या पात्रता फेरीत कर्नाटकच्या बिगरमानांकीत लक्ष चेंगप्पा एमए याने आंध्रप्रदेशच्या पाचव्या मानांकित जगदीश के.चा 15-9 14-16 15-11 असा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. दिल्लीच्या शुभम कुमार याने चंदीगढच्या अकुल मलिकचा 15-12 15-11 असा तर, तेलंगणाच्या किरण कुमार एम. याने गुजरातच्या जीत पटेलचा 15-8 15-10 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. महाराष्ट्राच्या आठव्या मानांकित प्रणय शेट्टीगरने तामिळनाडूच्या मंजुळा नवीन राजेंद्रनला 15-6 15-12 असे पराभूत केले.

महिला गटात तिसऱ्या पात्रता फेरीत महाराष्ट्राच्या अनन्या गाडगीळ हिने आंध्रप्रदेशच्या हेमा धृती ए.चे आव्हान 10-15 15-9 15-10 असे संपुष्टात आणले. दिल्लीच्या स्तुती अग्रवालने केरळच्या पंधराव्या मानांकित नाझरीन फरझाचा 10-15 15-5 15-9 असा तर, तेलंगणाच्या प्रशंसा बोनमने ओरिसाच्या अकराव्या मानांकित तन्वी पात्रीचा 15-13 17-15 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. हरियाणाच्या इशू मलिकने दिल्लीच्या चौदाव्या मानांकित नमिता पठानियाचा 15-11 15-13 असा पराभव करून आगेकूच केली.

निकाल: महिला एकेरी: तिसरी पात्रता फेरी:
अनुष्का जुयाल(उत्तरप्रदेश)वि.वि.श्रेया शेलार (महा)13-15 15-11 16-14;
तरनजीत कौर(कर्नाटक)वि.वि.झैनाब सईद(दिल्ली) 17-15 9-15 15-3;
मेधावी नागर(हरियाणा)[6]वि.वि.पंची पुरी(गुजरात) 15-11 15-4;
अनन्या गाडगीळ (महा)[23]वि.वि.हेमा धृती ए.(आंध्रप्रदेश)10-15 15-9 15-10;
स्तुती अग्रवाल(दिल्ली)वि.वि.नाझरीन फरझा(केरळ)[15]10-15 15-5 15-9;
प्रशंसा बोनम(तेलंगणा)वि.वि.तन्वी पात्री(ओरिसा)[11] 15-13 17-15;
इशू मलिक(हरियाणा)वि.वि.नमिता पठानिया(दिल्ली)[14] 15-11 15-13;
मृण्मयी देशपांडे(महा)[13] वि.वि.आराधना पदमता (आंध्रप्रदेश) 15-8 15-3;

पुरुष एकेरी: अंतिम पात्रता फेरी:

प्रणय शेट्टीगर (महा)[8]वि.वि.मंजुळा नवीन राजेंद्रन(तामिळनाडू) 15-6 15-12;
सूर्य किरण रेड्डी दुंडी (तेलंगणा)वि.वि.रवी फणी(आंध्रप्रदेश) 15-8 15-10;
अधीप गुप्ता (गुजरात)वि.वि.आदित्य त्रिपाठी (महा) 15-6 15-11;
ऋषभ राठोड (मध्यप्रदेश)वि.वि.मोहित सिंग(हरियाणा) 15-7 6-15 15-13;
ध्रुव नेगी (उत्तरप्रदेश)[16]वि.वि.हर्षित तोमर(उत्तरप्रदेश) 15-8 15-6;

शुभम कुमार (दिल्ली)वि.वि.अकुल मलिक (चंदीगढ) 15-12 15-11;
किरण कुमार एम.(तेलंगणा)वि.वि.जीत पटेल (गुजरात) 15-8 15-10;
लक्ष चेंगप्पा एमए(कर्नाटक)वि.वि.जगदीश के.(आंध्रप्रदेश)[5] 15-9 14-16 15-11;

मुख्य ड्रॉमधील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:

पुरुष एकेरी: 1.थरुण एम.(तेलंगणा), 2. भार्गव एस.(कर्नाटक), 3. सनीथ डी. एस(कर्नाटक), 4. वरुण कपूर (महा), 5. आर्य भिवपत्की (महा), 6. साई चरण कोया (आंध्रप्रदेश), 7. आलाप मिश्रा (मध्यप्रदेश), 8. कार्तिक जिंदाल (हरियाणा);

महिला एकेरी: 1.इशाराणी बरुआ(आसाम), 2.श्रुती मुंदडा(महा), 3.अनमोल खरब(हरियाणा), 4.मानसी सिंग(उत्तरप्रदेश), 5.आदिता राव(गुजरात), 6.आलिशा नाईक(महा), 7.अनुपमा उपाध्याय (दिल्ली), 8 नवीन कंदेरी (आंध्रप्रदेश).