पुणे, २८/०६/२०२३: काल सदाशिव पेठेमध्ये भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या नराधमाला आपल्या जीवाची पर्वा न करता त्याला पकडून त्या मुलीचा जीव वाचवणारे हर्षल पाटील यांचा भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
या वेळी बोलताना शहराध्यक्ष मुळीक म्हणाले की हर्षल पाटील व लेशपाल जवळगे या दोन युवकांनी काल धाडस दाखवून मुली वर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला रोखले व एक मोठी अप्रिय घटना होणायपासून वाचली त्यांनी केलेले धाडस हे समाजासाठी नक्कीच आदर्शवत आहे अशा घटना पुढच्या काळात घडूच नयेत पण घटना घडत असताना ती रोखून त्याचा प्रतिकार करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे
यावेळी शहराध्यक्ष मुळीक यांच्या सह उपाध्यक्ष धनंजय जाधव, निहाल घोडके पुणे शहर झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष विशाल पवार युवा मोर्चा शहर सरचिटणीस प्रतीक देसरडा सुनील मिश्रा प्रशांत सुर्वे माजी नगरसेवक मनीष साळुंखे शहर प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी