July 24, 2024

दहावीचा निकाल तीन टक्क्यांनी घसरला ;.९३.८३ टक्के विद्यार्थी यशवंत

पुणे, २जून २०२३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीचा निकाल आज जाहीर झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ३.११ टक्के घसरण झाली आहे. यंदाच्या परीक्षेत १५ लाख २९हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.
इयत्ता १०वीच्या परीक्षेत राज्यात कोकण विभागातील ९८.११टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागपूर विभागाचा ९२.०५टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे.

राज्य मंडळातर्फे घेतलेल्या या परीक्षेसाठी १५ लाख ४१ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १५लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल ३.११ टक्क्यांनी घट झाली आहे.

सर्व विभागीय मंडळातून ९५.८७ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून ९२.०५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ३.८२ टक्क्यांनी जास्त आहे.
राज्यात ३६ हजार ६४८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २१ हजार २१६ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ७४.२५ आहे.

निकालाची काही वैशिष्ट्ये
– ९२.४९ टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
– परीक्षा माध्यमे : ०८
– एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात प्रश्नपत्रिका नेणाऱ्या रनरचे जीपीएस झाले ट्रॅकिंग

…..
विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी
विभागीय : उत्तीर्णतेची टक्केवारी
पुणे : ९५.६४ टक्के
नागपूर : ९२.०५टक्के
औरंगाबाद : ९३.२३ टक्के
मुंबई : ९३.६६ टक्के
कोल्हापूर : ९६.७३ टक्के
अमरावती : ९३.२२ टक्के
नाशिक : ९२.२२ टक्के
लातूर : ९२.६७ टक्के
कोकण : ९८.११टक्के

…….
गेल्या चार वर्षातील निकालाची टक्केवारी
२०२३ : ९३.८६ टक्के
२०२२ : ९६.९४ टक्के
२०२१ : ९९.९५ टक्के
२०२० : ९५.३० टक्के