September 10, 2024

मुंबई – गोरखपूर आणि पुणे – दानापूर दरम्यान १६ अनारक्षित उन्हाळी विशेष गाड्या

पुणे, २७/०४/२०२३: सुट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि गोरखपूर तसेच पुणे आणि दानापूर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने याआधीच ९०० उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे आणि या न चाललेल्या अतिरिक्त विशेषसह, यावर्षी उन्हाळी विशेषची एकूण संख्या ९१६ असेल. १६ विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर साप्ताहिक अनारक्षित विशेष (८फेऱ्या )

01123 साप्ताहिक अनारक्षित विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २८.४.२०२३ ते १९.५.२०२३ (४ फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवारी १२.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी १८.५५ वाजता पोहोचेल.

01124 साप्ताहिक अनारक्षित विशेष गोरखपूर येथून दि. २९.४.२०२३ ते २०.५.२०२३ (४ फेऱ्या) पर्यंत दर शनिवारी २१.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०७.२५ वाजता पोहोचेल.

संरचना: २० सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगणा लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा आणि बस्ती.

पुणे – दानापूर साप्ताहिक साप्ताहिक अनारक्षित विशेष गाड्या (८ फेऱ्या)

01121 साप्ताहिक अनारक्षित विशेष गाडी दि. ३०.४.२०२३ ते २१.५.२०२३ (४ फेऱ्या) पर्यंत दर रविवारी पुण्याहून १६.१५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता पोहोचेल.

01122 साप्ताहिक अनारक्षित विशेष गाडी दि. २.५.२०२३ ते २३.५.२०२३ (४ फेऱ्या) पर्यंत दर मंगळवारी ००.१५ वाजता दानापूर येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १२.०५ वाजता पोहोचेल.

थांबे: दौंड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जं. आणि बक्सर.

संरचना: २० सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

प्रवाशांना विनंती आहे की, वरील सर्व गाड्या अनारक्षित म्हणून चालतील आणि सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह युटीएस प्रणालीद्वारे बुक केल्या जातील.