पुणे, २७/०४/२०२३: महापालिका हद्दीतील पुणेकरांसाठी पाच वर्षांपूर्वी सुरु केलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना आणि डॅा. श्यामा प्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य योजना बंद न करता पुनर्रचना करुन पुन्हा करा, अशी मागणी माजी महापौर आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
मा. महापौर मोहोळ यांनी आयुक्तांकडे विमा आणि आरोग्य तपासणी योजना पनर्रचनेसर पुन्हा सुरु करण्याची मागणी केली असून मा. महापौर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या योजना कार्यान्वित केल्या होत्या आणि सलग पाच वर्षे सुरुही ठेवल्या. मात्र प्रशासक म्हणून अंदाजपत्रक मांडताना या योजनांना तरतूद न दिल्याने योजना बंद आहेत. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी भेट घेत मागणीचे निवेदन दिले आहे.
याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, या दोन्ही योजना गरजू पुणेकरांसाठी पुन्हा सुरु होणे आवश्यक असून प्रशासनाने या योजनांची तातडीने अभ्यास करुन पुनर्रचना करावी. या योजना पुणेकरांसाठी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे यावर लवकरच घेण्यात यावा’
‘ रजामुदतीच्या एकूण ९३ शिक्षकांना सेवेत कायम करणे आणि १५२ समूह संघटक आणि संघटिका यांना सेवेत कायम करणे, याही मागण्या आयुक्तांकडे केल्या आहेत. शिवाय बिबवेवाडी-धनकवडी पुनर्वसन योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जवळपास ८ हजार निवासी आणि बिगरनिवासी गाळे हस्तांतरण प्रक्रियेची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी, अशीही मागणी केल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.
‘चांदणी चौकातील स्वराज्य शिल्पाचे काम त्वरित सुरु करा’
चांदणी चौकातील जिजाऊ मॅांसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य शिल्प साकारण्यात येणार असून या शिल्पाची निविदा प्रक्रिया लवकर करावी, अशीही मागणी मोहोळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.
More Stories
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला: महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
सिंबायोसिस तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन