May 16, 2024

पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अकादमी, ब्रिलियंट संघांचा पहिला विजय

पुणे, 24 फेब्रुवारी 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब (14 वर्षांखालील) चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अकादमी संघाने व्हिजडम  संघाचा तर ब्रिलियंट संघाने विराग आवटे संघाचा पराभव करत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला.
 
व्हिजडम क्रिकेट अकादमी मैदान येथे झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात शौर्य देशमुखच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अकादमी संघने व्हिजडम संघाचा 8 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना विश्वराज डांबे, शौर्य देशमुख व कृष्णा पांडे यांच्या अचूक गोलंदाजीने व्हिजडम संघाचा डाव 26.3 षटकांत सर्वबाद 101 धावात रोखला. 101 धावांचे लक्ष देवाशिष घोडकेच्या 33 व प्रणय सिसवालच्या नाबाद 28 धावांसह क्रिकेट नेक्स्ट अकादमी संघाने 15 षटकांत 2 बाद 104 धावा करत विजय मिळवला. शौर्य देशमुख सामनावीर ठरला.
ब्रिलियंट क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना ब्रिलियंट संघाने विराग आवटे संघाचा 8 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना विराग आवटे संघाने 30.4 षटकांत सर्वबाद 102 धावा केल्या. 102 धावांचे लक्ष ब्रिलियंट संघाने 14 षटकात 2 गडी गमावत 104 धावा करून पुर्ण करत विजय मिळवला. शिवरत्न सूर्यवंशीने 39 चेंडूत 7 चौकार व एका षटकारासह नाबाद अर्धशतक करत संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
व्हिजडम: 26.3 षटकांत सर्वबाद 101 धावा(पृथ्वीराज खांडवे 23(46,5×4), अथर्व आखाडे 17(13,4×4), साईराज शिर्के 16(19,2×4), विश्वराज डांबे 4-19, शौर्य देशमुख 4-28, कृष्णा पांडे 2- 36) पराभूत वि क्रिकेट नेक्स्ट अकादमी : 15 षटकांत 2 बाद 104 धावा(देवाशिष घोडके 33(34,7×4), प्रणय सिसवाल नाबाद 28(19,4×4,1×6), सिद्धांत बाफना नाबाद 11, प्रीत श्रॉफ 1-19) सामनावीर-शौर्य देशमुख
क्रिकेट नेक्स्ट अकादमी संघ 8 गडी राखून विजयी.
 
विराग आवटे: 30.4 षटकांत सर्वबाद 102 धावा (स्वराज गायकवाड  31(64,5×4), अर्जुन थोरात 14, शिवराज सूर्यवंशी 3-7, पृथ्वी पालणे 2-9, आर्या कुमावत 2-13, कृष्णा गायकवाड 1-8 ) पराभूत वि ब्रिलियंट: 14 षटकात 2 बाद 104 धावा(शिवरत्न सूर्यवंशी नाबाद 53(39,7×4,1×6), शौर्य जाधव 25(24,4×4), आर्यन जैन 1-4, अर्जुन थोरात 1-34) सामनावीर- शिवरत्न सूर्यवंशी; 
ब्रिलियंट संघ 8 गडी राखून विजयी.