पुणे, 21 फेब्रुवारी 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब (14 वर्षांखालील) चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक संघाने गॅरी कर्स्टन संघाचा तर स्पार्क्स स्पोर्टिव्ह संघाने विराग आवटे संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
व्हिजन क्रिकेट अकादमी मैदान येथे झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात रुहुल्ला नदाफच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या बळावर व्हेरॉक संघाने गॅरी कर्स्टन संघाचा 369 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला. पहिल्यांदा खेळताना व्हेरॉक संघाने 50 षटकात 6 बाद 448 धावांचा डोंगर रचला. यात रुहुल्ला नदाफने केवळ 104 चेंडूत तब्बल 32 चौकार व एका षटकारासह 172 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. अथर्व औटेने 75 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारांसह 92 धावा व प्रतीक कडलकने 70 करून रुहुल्लाला सुरेख लाथ दिली. 448 धावांच्या आव्हानाचा सामना करताना अद्विक तिवारी, अथर्व औटे , रुहुल्ला नदाफ व अथर्व वैद्य यांच्या अचूक गोलंदाजीपुढे गॅरी कर्स्टन संघ 22.2 षटकात सर्वबाद 79 धावांत गरद झाला. 172 धावा व 2 गडी बाद करणारा रुहुल्ला नदाफ सामनावीर ठरला.
व्हिजडम क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या सामन्यात तन्मय पाटीलच्या शतकी खेळीच्या जोरावर स्पार्क्स स्पोर्टिव्ह संघाने विराग आवटे संघाचा 213 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना स्पार्क्स स्पोर्टिव्ह संघाने 50 षटकांत 6 बाद 271 धावा केल्या. यात तन्मय पाटीलने 114 चेंडूत 18 चौकारांसह 114 केल्या. शंतनू फतेने 39 व विराट उत्तेकरने 37 धावा करून तन्मयला सुरेख साथ दिली. 271 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थ पांडे, वीरेन व तन्मय पाटील यांच्या अचूक गोलंदाजीपुढे विराग आवटे संघ 24.4 षटकांत सर्वबाद 79 धावांत गारद झाला. तन्मय पाटील सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
व्हेरॉक: 50 षटकात 6 बाद 448 धावा (रुहुल्ला नदाफ 172(104,32×4,1×6), अथर्व औटे 92(75,10×4,2×6), प्रतीक कडलक 70(52,10×4,2×6), प्रज्वल मोरे नाबाद 35(582×6) ), श्रेयस शिवरकर नाबाद 16(14,1×6), पज्ञेश अने 3-85) वि.वि गॅरी कर्स्टन: 22.2 षटकात सर्वबाद 79 धावा(आयुष नवाळे 40(41,6×4,1×6), इद्रिस हकीम 14, अद्विक तिवारी 41-8 अथर्व औटे 3-13, रुहुल्ला नदाफ 2-8, अथर्व वैद्य 1-21) सामनावीर- रुहुल्ला नदाफ
व्हेरॉक संघ 369 धावांनी विजयी
स्पार्क्स स्पोर्टिव्ह: 50 षटकांत 6 बाद 271 धावा(तन्मय पाटील 114(114,18×4), शंतनू फते 39(65,5×4), विराट उत्तेकर 37(39,5×4), ध्रुविल रायथाथा 21, सौरभ थोरात 3, विराट 3. 2-24) वि.वि विराग आवटे: 24.4 षटकांत सर्वबाद 79 धावा(स्वराज गायकवाड 12, अथर्व कदम 10, पार्थ पांडे 3-14, वीरेन 2-8, तन्मय पाटील 1-5) सामनावीर-तन्मय पाटील
स्पार्क्स स्पोर्टिव्ह संघ 213 धावांनी विजयी
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.