May 13, 2024

पीवायसी हिंदू जिमखाना तर्फे पी वाय सी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेचे पुण्यात आयोजन

पुणे, दि. २१ फेब्रुवारी 2023:  पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित  पी वाय सी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वात जुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, बारणे, वीरांगण येथील मैदानावर दि. २३ फेब्रुवारी २०२३ पासून खेळली जाणार आहे.
स्पर्धेविषयी पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागू, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड व स्पर्धेचे प्रायोजक  गोल्डफिल्ड प्रॉपर्टीजचे अनिल छाजेड आणि टी.एन.सुंदर यांनी पी वाय सी च्या कार्यकारिणी समितीचे  गेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त असलेल्या परंपरेला चालू ठेवल्याबद्दल आभार मानले.  स्पर्धेेचे सामने बाद पध्दतीने खेळविण्यात येणार आहेत. विजेता व उपविजेता संघाला चषक दिला जाणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्ठीरक्षक, क्षेत्ररक्षक व मालिकेचा मानकऱ्याला प्रत्येकी चषक देण्यात येणार आहेत.
स्पर्धेला सलग आठवे वर्षी प्रायोजित केल्याने आम्ही  गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज यांचे आभारी आहोत, असे श्री  द्रविड यांनी सांगितले.
स्पर्धेचे प्रायोजक  गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज अनिल छाजेड म्हणाले की, क्रिकेट विश्वात एकदिवसीय सामने सुरू होण्याआधी 1950 मध्ये मांडके चषक ही अनोखी व नाविन्यपुर्ण स्पर्धा पुण्यात सुरू करण्यात आली होती. या मांडके चषक स्पर्धेप्रमाणे गोल्डफिल्ड  यांचे प्रकल्प भविष्यकाळाची पावले ओळखुन तयार करण्यात येतात. त्यामुळे अशा स्पर्धेशी संलग्न होऊन  गोल्डफिल्डनेही पुढचे पाऊल टाकले आहे.
या स्पर्धेव्दारे गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळत आहे.  गोल्डफिल्ड  हे नेहमीच अशा स्पर्धांना प्रोत्साहन देत आहेत व यापुढेही देत राहील, असे छाजेड यांनी आवर्जुन सांगितले.
गोल्डफिल्डने आपल्या प्रकल्पामध्ये दापोली येथे आधुनिक स्पोर्टस्‌ फॅसिलिटी उभारले आहे. या स्पोर्टस्‌ क्लबचे वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोई-सुविधा असलेले क्रिकेट मैदान, इंडोर-आऊटडोअर स्पोर्टस्‌ आणि आधुनिक पध्दतीचे(इंग्लिश टाईप)पॅव्हेलियन यांसह राहण्याची व उपहारगृह याची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली असल्याचे  गोल्डफिल्डचे टी.एन.सुंदर यांनी सांगितले.
स्पर्धेचे नियम व पध्दत वेगळी आहे. या स्पर्धेचे सामने 2 डावांत खेळवले जाणार आहेत. पहिला डाव 40 षटकांचा व दुसरा डाव 20 षटकांचा होणार असून एक षटक 8 चेंडूचे असणार आहे, असे विनायक द्रविड यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, संघातील खेळाडू बाद झाल्यास त्या संघाच्या डावातील एकुण धावसंख्येतून 5 धावा कमी करण्यात येणार आहेत. जर पहिल्या किंवा दुसऱ्या डावामध्येे संघाने आपला डाव घोषित केला तर, त्या संघातील खेळाडू सर्व बाद ठरविले जातील  व संघाच्या एकुण  धावसंख्येतून 50 धावा कमी करण्यात येतील. सामन्याच्या शेवटी दोन्ही संघाच्या धावा व बाद झालेल्या खेळाडूंची संख्या समान ठरल्यास सामन्याचा निकाल हा 8 चेंडुच्या सुपर ओव्हरमधील निकालावर ठरविण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले की, पुर्ण 40 षटकासाठी तीस यार्डाचा नियम लागु आहे. स्पर्धेत गोलंदाजाला पहिल्या डावात जास्तीत जास्त 8 षटके व दुसऱ्या डावात 4 षटके अशी गोलंदाजी करता येईल. स्पर्धेची पध्दत व नियमांमुळे सामने शेवटच्या चेंडुपर्यंत रंगतदार ठरतील.
स्पर्धेत आयोजक पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या बरोबरच डेक्कन जिमखाना, पुना क्लब, व्हेेरॉक- वेंगसरकर अकादमी, क्लब ऑफ महाराष्ट्र, केडन्स, पारसी जिमखाना, पुनीत बालन केदार जाधव क्रिकेट अकॅडमी, स्पोर्ट्समन क्रिकेट क्लब, Ambitious क्रिकेट क्लब, युनाइटेड स्पोर्ट्स क्लब, पूना क्लब  असे  संघ या स्पर्धेत झुंजणार आहेत.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये विनायक द्रविड, निरंजन गोडबोले, इंद्रजित कामतेकर, पराग शहाणे, कपिल खरे आदींचा समावेश आहे.