October 16, 2025

Pune: आयकर अधिकाऱ्यांविरोधात लोकजनशक्ती रामविलास पक्षाचे आंदोलन

पुणे, 05/06/2025: लोकजनशक्ति पार्टी रामविलासच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील आयकर विभागाच्या गुलटेकडी येथील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. पक्षाने इन्कम टॅक्स इनफॉर्मेंट्स रिवॉर्ड स्कीम २०१८ अंतर्गत इन्फॉर्मंट कोड मिळविण्याच्या मागणीकडे  प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध केला.पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय अल्हाट यांनी सांगितले की,’आम्ही आयकर चुकवणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांची विश्वसनीय माहिती दिली असूनही प्रशासन त्वरित कारवाई करत नाही,त्यामुळे आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल’.

आयकर विभागाच्या सॅलिसबरी पार्क (गुलटेकडी) कार्यालयातील मोहित जैन,पीयूषकुमार सिंह यादव,आनंद उपाध्याय  या  अधिकाऱ्यांनी कर चुकविणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांची माहिती पक्षाने दिलेली असतानाही कारवाई केली नाही,त्याला त्यांचा निष्क्रिय आणि भ्रष्ट कारभार कारणीभूत आहे,त्यांच्यावर केंद्र सरकारने कारवाई करावी,अशी मागणी केली.

याबाबतच्या निवेदनाच्या प्रती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन,केंद्रीय अन्न व प्रक्रिया मंत्री चिराग पासवान,तसेच आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

आंदोलनात शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.त्यांनी इन्फॉर्मंट कोड त्वरित देण्यात यावा,अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि भ्रष्टाचारविरोधी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.

पक्षाचे  कायदेशीर सल्लागार मिलिंद गायकवाड,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यरत अंकल सोनवणे,पक्षाचे पदाधिकारी  के.सी.पवार,अमर पुणेकर, आलोक गिरणे, उमेश चव्हाण, विजय अठवाल , दीपक श्रीवास्तव, संजय चव्हाण, सुरज तुपे, आप्पा कोंढाळकर,संभाजीराव खोत,अॅड. अमित दरेकर,रणजित सोनावळे,कुसुम दहीरे,योगिता साळवे,सरचिटणीस,नारायणराव भिसे,राहुल उभे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

You may have missed