पुणे, ७ जून २०२५ः भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी येथील आमदार शंकर मांडेकर यांच्या पुढाकाराने विविध सेवा व सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. काही नव्या सुविधा शासन मान्यतेच्या प्रक्रियेत असून, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पर्यटन समन्वयक आनंद गोरड यांनी दिली.
या तीनही तालुक्यांतील पर्यटन स्थळांचा व्यापक प्रचार व प्रसार करण्यासाठी येत्या १५ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘राजगड पर्यटन महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात राष्ट्रीय पातळीवरील पर्यटन संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याआधी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या महोत्सवाचे औपचारिक घोषणाही केली जाणार आहे.
महोत्सवाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून, पानशेत परिसरातील प्रमुख पर्यटन स्थळांची आणि साहसी उपक्रमांची पाहणी करण्यासाठी सर्व सन्माननीय पत्रकारांसाठी एक दिवसीय पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा दौरा पर्यटकांच्या गर्दीचे दिवस – शनिवार आणि रविवार वगळून – इतर दिवशी घ्यावयाचा असून, यासंदर्भात पत्रकारांनी त्यांच्या सोयीचा दिवस सूचित करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे या भागातील स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. राजगड किल्ला, पानशेत धरण, साहसी क्रीडा प्रकार, निसर्गप्रेमींना भुरळ घालणारी ठिकाणे यामुळे हा परिसर भविष्यात एक महत्त्वाचा पर्यटन केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास स्थानिक प्रशासन व्यक्त करत आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही