पुणे, ३० जून २०२५: बाल न्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत नोंदणीकृत तसेच मान्यता प्राप्त संस्थांच्या तपासणीसाठी जिल्हास्तरावर गठीत करण्यात येणाऱ्या समितीवर अशासकीय सदस्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी २१ जुलै २०२५ पर्यंत आपले अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या समितीवर दोन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामध्ये बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समुहातील एक प्रतिनिधी आणि बालकांसोबत कामाचा अनुभव असलेला एक मानसोपचार तज्ज्ञ यांचा समावेश असेल. अर्जदार किमान पदवीधर असावा, तसेच बालहक्क व कल्याण क्षेत्रातील किमान १० वर्षांचा अनुभव असावा. अर्जदाराचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. निवड झालेल्या अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ नेमणुकीच्या तारखेपासून तीन वर्षांचा राहणार आहे.
अर्ज प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र परिसर, बिडी कामगार वसाहत, गोल्फ क्लब रोड, आंबेडकर चौक, येरवडा, पुणे – ४११००६ येथे संपर्क साधावा. तसेच दूरध्वनी क्रमांक ०२०-२५५३६८७ किंवा jimbapune@yahoo.com या इमेलवरही संपर्क साधता येईल, असे आवाहन श्रीमती बिरारीस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही