March 3, 2026

सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत फुटबॉल लीगमध्ये हिलग्रीन स्कूल, लॉयला हायस्कूल, विद्या व्हॅली स्कुल संघांचे एकतर्फी विजय

पुणे, दि. 30 जानेवारी 2026 – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे आयोजित सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत फुटबॉल लीगमध्ये हिलग्रीन स्कूल, लॉयला हायस्कूल, विद्या व्हॅली स्कुल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर सनसनाटी विजय मिळवत आगेकूच केली.

सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या लढतीत आरुष कांबळे(12मि.) याने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर सेंट पॅट्रिक्स स्कूल संघाने डॉ. एरिन नगरवाला स्कूल संघाचा 1-0 असा पराभव केला. अंश देवकर 3,6,10 मि.,) याने केलेल्या हॅट्रिक कामगिरीच्या जोरावर हिलग्रीन स्कूल संघाने श्री श्री रविशंकर स्कूल संघावर 4-1 असा विजय मिळवला.

अन्य लढतीत आरव पाटील(5मि.), अयांश देवळे(13मि.) यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर लॉयला हायस्कूल संघाने डॉ. एरीन नगरवाला स्कुलचा 2-0 असा सहज पराभव केला. विद्या व्हॅली स्कुल संघाने क्लाइन मेमोरियल स्कूलला 2-0 असे पराभूत केले. विजयी संघाकडून एकांश ओझा(3मि.), कुरोस जीवनी(10मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चुरशीच्या लढतीत सेंट व्हिन्सेंट हायस्कूल संघाने लॉयला हायस्कूल संघाला गोलशून्यबरोबरीत रोखले.

निकाल: साखळी फेरी:
सेंट व्हिन्सेंट हायस्कूल: 0 बरोबरी वि.लॉयला हायस्कूल: 0;
सेंट पॅट्रिक्स स्कूल: 1(आरुष कांबळे 12 मि.) वि.वि.डॉ. एरिन नगरवाला स्कूल:0;
दस्तूर को-एड स्कूल: 2(विवान परदेशी 7,14 मि.)वि.वि.श्री श्री रविशंकर स्कूल: 0;
विद्या व्हॅली स्कुल: 2(एकांश ओझा 3मि., कुरोस जीवनी 10मि.)वि.वि.क्लाइन मेमोरियल स्कूल: 0;
सेंट पॅट्रिक्स स्कूल: 0 बरोबरी वि.द कल्याणी स्कूल: 0;
सेंट व्हिन्सेंट स्कूल: 7 (अद्विक राऊत 2,4,5,10,12 मि., अंगद प्रधान 9 मि., साई 11 मि.,) वि.वि.हिलग्रीन स्कूल: 1 (महाबर जळगावकर 13 मि.);
लॉयला हायस्कूल: 2(आरव पाटील 5 मि., अयांश देवळे 13मि.)वि.वि.डॉ. एरीन नगरवाला स्कुल: 0;
विद्या व्हॅली स्कूल: 5(एकांश ओझा 3, 6 मि., सुवन घोष 4मि., आदित्य दिवेद 7मि., अहान बैस 12मि.)वि.वि.दस्तूर को-एड स्कूल: 0;
सेंट व्हिन्सेंट हायस्कूल: 4 (अण्विक लोबो 1मि., ब्रेदली काळे 5 मि., अंगद प्रधान 11मि., अंश अलाठ 16मि.)वि.वि.द क्लाइन मेमोरियल स्कूल: 0;
हिलग्रीन स्कूल: 4 (अंश देवकर 3,6,10 मि., झिदान सय्यद 14 मि.) वि.वि. श्री श्री रविशंकर स्कूल: 1 (आयुष जाधव 11 मि.).