March 3, 2026

केएमबीए बास्केटबॉल लीग स्पर्धेत बुल्स, स्पार्क्स संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे, 30 जानेवारी 2026: कर्णा मेहता बास्केटबॉल अकॅडमी (केएमबीए) यांच्या वतीने आयोजित केएमबीए बास्केटबॉल लीग स्पर्धेत मुलांच्या गटात बुल्स संघाने , तर मुलींच्या गटतट स्पार्क्स संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. 
 
एबिल कॅसल रॉयल टॉवर्स, भोसले नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत मुलांच्या गटात बुल्स संघाने बक्स संघाचा 45-42 असा पराभव करून आगेकूच केली. बुल्स संघाकडून उज्वल शैजू(10गुण), निवान शेवाळे(6गुण), यश देशपांडे(6गुण), निवान सावंत(6गुण), तनश गुप्ता(4गुण), आदिव अग्रवाल(4गुण) यांनी सुरेख कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात रणबीर सिंग(18गुण), अनिश जासुजा(14गुण), श्रेयस मंडल(7गुण), अर्चित रेड्डी(6गुण), मितांश ताथेड(5गुण), सुमैर मुथा(4गुण) यांनी सुरेख खेळी केली. अंतिम लढतीत बुल्स संघासमोर बक्स संघांचे आव्हान असणार आहे. 
 
मुलींच्या गटात स्पार्क्स संघाने स्टॉर्मचा 38-31 असा पराभव केला. विजयी संघाकडून अरिशा पिंपोडकर(12गुण), कियारा गाडा(10गुण), इवाना बग्गा(4गुण), इशा मालपाणी(2गुण), रिधिमा दुबे(2गुण), निश्चल अग्रवाल(2गुण) यांनी अफलातून कामगिरी केली. अन्य लढतीत लिंक्स संघाने एसेस संघाचा 24-23 असा कडवा प्रतिकार केला. अंतिम लढतीत स्पार्क्स संघाचा सामना एसेस संघाशी होणार आहे.  
 
निकाल: साखळी फेरी: मुले:
जॅझ: 57(रणबीर सिंग 18 गुण, अनिश जासुजा 14 गुण, श्रेयस मंडल 7गुण, अर्चित रेड्डी 6गुण, मितांश ताथेड 5गुण, सुमैर मुथा 4गुण)वि.वि. स्पर्स: 55 (नीव नवनी 27 गुण, क्रिशव बाफना 10गुण, द्रिश शहा 2गुण, अनय शहा 9गुण, समर मुथा 5गुण, वंदित बाकलीवाल 2गुण);

 

बुल्स:45(उज्वल शैजू 10गुण, निवान शेवाळे 6गुण, यश देशपांडे 6गुण, निवान सावंत 6गुण, तनश गुप्ता 4गुण, आदिव अग्रवाल 4गुण)वि.वि. बक्सः  42(वीर दाढा 14गुण, मनन संपत 4गुण, विवान शेंडे 2गुण, आरव मेहता 10गुण, रिशान लाहोटी 4गुण, अमेय पांढरे  4गुण);  
 
मुली:
स्पार्क्स: 38 (अरिशा पिंपोडकर 12गुण, कियारा गाडा 10गुण, इवाना बग्गा 4गुण, इशा मालपाणी 2गुण, रिधिमा दुबे 2गुण, निश्चल अग्रवाल 2गुण)वि.वि.स्टॉर्म:31(प्रिस्का शिवनानी 10गुण, अनन्या कालकर 5गुण, डिमेरा गांधी 2गुण, इरा पलरेशा 8गुण, शमिका सम 4गुण, आरिया अग्रवाल 2गुण);
 
लिंक्स: 24 (दिव्यांका भोसले 7गुण, राधा गुप्ता 5गुण, महिका सम 4गुण, अनाहिता गुप्ता 2 गुण) वि.वि.एसेस: 23(साईशा शेंडे 5गुण, महिमा कावा 4गुण, साई लक्ष्मी 3गुण, समायरा मेहता 6 गुण, उमा कुलकर्णी 2गुण, आरिका महाबळेश्वरकर 1गुण).