पुणे, 3 फेब्रुवारी 2026: पुणे शहराचा आगामी महापौर कोण होणार यावरून गेले दोन आठवडे भाजपने सस्पेन्स तयार केलेला होता. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही मिनिट आधी महापौर पदाचा उमेदवार जाहीर करून टाकला. यामध्ये कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या मंजुषा नागपूर यांना महापौर होण्याची संधी भाजपने दिलेली आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीतील घटक पक्षाकडे उपमहापर्पद दिले आहे परशुराम वाडेकर हे उपमहापूर बंद होणार आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने 165 पैकी 119 जागा जिंकून एक हाती सत्ता आणलेली आहे. भाजपला सलग दुसऱ्यांदा एक हाती सत्ता मिळाल्यामुळे पक्षातील नगरसेवकांना आपल्याला महत्त्वाचे पदे मिळतील अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे. त्यासाठी नव्या जुन्या नगरसेवकांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावलेली होती. महापौर पद हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या पदासाठी कोण पात्र होणार पक्ष कोणाची निवड करणार याकडे लक्ष लागलेली होते. यामध्ये सुरुवातीपासून मंजुषा नागपुरे यांचे नाव चर्चेत होतेच पण त्यासोबत वर्षा तापकीर, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, स्वरदा बापट, निवेदिता एकबोटे, उज्वला जंगले यांची देखील नावे चर्चेत होती. भाजप अनुभवी चेहऱ्याला संधी देणार की नवखा महापौर करून धक्का तंत्राचा अवलंब करणार याकडे लक्ष लागलेले होते. या इच्छुकांनी आपापल्या परीने पक्षातील नेत्यांकडे त्यांची बाजू मांडून दावेदारी पक्की करण्याचा प्रयत्न केलेला होता.
सोमवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पाडली होती. त्यामध्ये मंजुषा नागपुरे, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे या तिघांच्या नावावर शिक्कामोर्तब करून यापैकी एक नाव निवड करण्याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले होते. त्यानुसार आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी महापौर पदाचा अर्ज भरलेला आहे
मंजुषा नागपुरे यांचे शिक्षण एमकॉम एमबीए झालेले असून त्या एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होत्या. ही नोकरी सोडून त्यांनी 2012 मध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती. ही निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी आतापर्यंत सलग तीन निवडणुका जिंकलेले आहेत. 2026 ची निवडणूक त्या बिनविरोध निवडून आलेले आहेत. मंजुषा नागपूर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या होत्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत देखील त्यांनी सक्रियपणे काम केलेले आहे. त्यांचे पती दीपक नागपुरे हे सक्रिय हिंदुत्ववादी कार्यकर्ते असून त्यांनी विश्व हिंदू परिषदेची महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली होती. त्यामुळे संघाकडून देखील त्यांच्या नावाला पसंती देण्यात आलेली होती. अखेर या नावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे नेत्यांचे एकमत झाल्याने त्यांची निवड करण्यात आलेली आहे.
भाजपचा महायुतीतला घटक पक्ष रिपाई चे नगरसेवक परशुराम वाडेकर यांना उपमहापौर होण्याची संधी भाजपने दिलेली आहे. परशुराम वाडेकर यांच्या पत्नी सुनीता वाडेकर या 2020 ते 2022 या कालावधीमध्ये उपमहापौर होत्या. पती आणि पत्नी महापौर होण्याचा हा पहिलाच मान पुणे शहरात वाडेकर दांपत्यांना मिळालेला आहे. वाडेकर हे गेल्या 25 वर्षापेक्षा जास्त काळापासून रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी औध बोपोडी या प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणूक लढवली होती. त्यांना महायुतीतील जागा वाटपाप्रमाणे उपमहापौर पद देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन करून उपमहापौर पद वाडेकर यांना द्यावे असे सूचना केल्या होत्या त्यानुसार वाडेकर यांनी उपमहापौर पदाचा अर्ज भरलेला आहे.

More Stories
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न
विमाननगरातील रामेश्वरम हॉटेलवर महापालिकेचा हातोडा; ६,५०० चौ. फूट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती