April 20, 2026

केएमबीए बास्केटबॉल लीग स्पर्धेत मुलींच्या गटात एसेस संघाला विजेतेपद

पुणे, 31 जानेवारी 2026: कर्णा मेहता बास्केटबॉल अकॅडमी (केएमबीए) यांच्या वतीने आयोजित केएमबीए बास्केटबॉल लीग स्पर्धेत मुलींच्या गटात एसेस संघाने , तर मुलांच्या गटात बुल्स संघाने विजेतेपद संपादन केले.

एबिल कॅसल रॉयल टॉवर्स, भोसले नगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम लढतीत मुलींच्या गटात एसेस संघाने स्पार्क्स संघाचा 34-26 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. एसेस संघाकडून महिमा कावा(9गुण), साईशा शेंडे(6गुण), समायरा मेहता(4गुण), ह्रया सूद(6गुण), अनैशा अग्रवाल(5गुण), उमा कुलकर्णी(2गुण), आरिका महाबळेश्वरकर(2गुण) यांनी सुरेख कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत प्रिस्का शिवनानी(9गुण),शमिका समा(4गुण), आरिया अग्रवाल(2गुण), सई बर्गे(2गुण),काव्या भंडारी(2गुण), युक्ता नायर(2गुण), अनन्या कालकर(1गुण) यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर स्टॉर्म संघाने लिंक्स संघाचा 22-18 असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले.

मुलांच्या गटात अंतिम सामन्यात बुल्स संघाने बक्स संघाचा 45-42 असा पराभव करूंन विजेतेपदाचा मान पटकावला. विजयी संघाकडून उज्वल शैजू(20गुण), निवान सावंत(8गुण), प्रणव कलिंगल(6गुण), यश देशपांडे(4गुण), निवान शेवाळे(2गुण), तनश गुप्ता(3गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत नीव नवानी(6गुण), समर मुथा(4गुण), अनय शाह(3गुण), क्रिशव बाफना(3गुण), ऋषभ गोयल(2गुण), इंद्रनील त्रिमल (2गुण) यांनी उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्स संघाने जॅझ संघाचा 22-16 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण चॅम्पियन स्पोर्ट्सचे अमित मदन, स्कार्टर्सचे दर्शन शहा, एएमटूएएम सलूनचे पुनम शेंडे आणि मंकी आईसचे अंकुश मल्होत्रा, फर्स्ट क्रायचे विवेक गोयल व अनिरुद्ध चतुर्वेदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक कर्णा मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेला चितळे बंधूचे इंद्रनील चितळे, जेट सिंथेसिसचे राकेश नवानी, ३२ स्माईल्स डेन्टल क्लिनिकचे डॉ. मिलिंद दर्डा यांचा पाठींबा लाभला आहे.

निकाल: मुली: अंतिम फेरी:
एसेस: 32 (महिमा कावा 9 गुण, साईशा शेंडे 6गुण, समायरा मेहता 4गुण, ह्रया सूद 6गुण, अनैशा अग्रवाल 5गुण, उमा कुलकर्णी 2गुण, आरिका महाबळेश्वरकर 2गुण)वि.वि.स्पार्क्स: 24 (अरिशा पिंपोडकर 10गुण, मानसी कावा 6गुण, इवाना बग्गा 4गुण, मिराई चौधरी 2गुण, निश्चल अग्रवाल 2गुण);

तिसऱ्या/चौथ्या स्थानासाठी लढत: स्टॉर्म: 22(शमिका समा 4गुण, आरिया अग्रवाल 2गुण, सई बर्गे 2गुण, प्रिस्का शिवनानी 9गुण, काव्या भंडारी 2गुण, युक्ता नायर 2गुण, अनन्या कालकर 1गुण)वि.वि.लिंक्स: 18(दिव्यांका भोसले 6गुण, अनहिता गुप्ता 4गुण, आरोही वर्धन 3गुण, माहिका समा 2गुण, राशी पोरवाल 2गुणसियोना गोयल 1गुण,);

मुले: अंतिम फेरी:
बुल्स: 45(उज्वल शैजू 20गुण, प्रणव कलिंगल 6गुण, यश देशपांडे 4गुण, निवान शेवाळे 2गुण, निवान सावंत 8गुण, तनश गुप्ता 3गुण)वि.वि. बक्स: 42(मनन एस 8 गुण, वीर दाढा 8गुण, आरव मेहता 8गुण, अमेय पांढरे 4गुण, संविद नारकर 3गुण, जैत थापर 3गुण, नील मोरीयंथन 4गुण, विवान शेंडे 2गुण, दीश्वथ कुंडुर्थी 2गुण, विआन जैन 2गुण);

तिसऱ्या/चौथ्या स्थानासाठी लढत: स्पर्स: 22 (नीव नवानी 6गुण, समर मुथा 4गुण, अनय शाह 3गुण, क्रिशव बाफना 3गुण, ऋषभ गोयल 2गुण, इंद्रनील त्रिमल 2गुण)वि.वि.जॅझ: 16(सुमैर मुथा 4गुण, अर्चित रद्दी 5गुण, अर्श अग्रवाल 2गुण, रणबीर सिंग 2गुण, अनिश जासुजा 2गुण).