March 5, 2026

पुना क्लब बिलियर्ड्स व स्नूकर लीग स्पर्धा रॉकेट्स, मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स, मनीषा रॉयल्स संघांची विजयी सलामी

पुणे, 4 फेब्रुवारी 2026: पुना क्लब लिमिटेड यांच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पुना क्लब बिलियर्ड्स व स्नूकर लीग 2026(पीसीबीएसएल) स्पर्धेत साखळी फेरीत रॉकेट्स, मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स, मनीषा रॉयल्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पुना क्लब बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरी सलामीच्या लढतीत विघ्नेश संघवी, हुजेफा टी, राहुल बग्गा, राजेश जांदियाल यांच्या विजयी कामगिरी जोरावर रॉकेट्स संघाने आरएस कॅनन्स संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली.

दुसऱ्या लढतीत मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने नील आणि ओबेरॉय किंग्जचा 3-2 असा पराभव करून विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून प्रशांत राजघरिया, रोहिंग्टन इराणी, संजय जाधव, राजीव खांडके, मुनीझ पुनावाला यांनी सुरेख कामगिरी बजावली. अन्य लढतीत
मनीषा रॉयल्स संघाने दोराबजी टोरनॅडोजचा 3-2 असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली. मनीषा रॉयल्सकडून अयान खान, अश्रफ परवानी, कुणाल वासवानी, अश्रफ परवानी, योगेश अंकलेसारिया, आशिष खेरा यांनी अफलातून कामगिरी केली.

याआधी स्पर्धेचे उदघाटन पुना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष गौरव गढोक, पुना क्लबच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष व लीगचे चेअरमन तुषार आसवानी, मुख्य प्रायोजक मनिषा कन्स्ट्रक्शनचे संचालक राजन खिंवसरा आणि अभिषेक खिंवसरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुना क्लबचे माजी अध्यक्ष सुनील हांडा, संजय संघवी, मुकेश संघवी आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: लीग फेरी:
रॉकेट्स वि.वि.आरएस कॅनन्स 3-2(15 रेड स्नूकर एकेरी: वैभव शहा पराभूत वि. कपिल पंजाबी 78-81; बिलियर्ड्स: विघ्नेश संघवी वि.वि. कैवल्य खानापुरे 200-151; रूलेट: वैभव शहा, विघ्नेश संघवी, हुजेफा टी, राहुल बग्गा, राजेश जांदियाल वि.वि.रिकी राजपाल, कपिल पंजाबी, अनिल काकडे, पंकज परमार, क्रिश रघानी 2-1; 9रेड स्नूकर दुहेरी: हुजेफा टी/राजेश जंदियाल पराभुत वि.रिकी राजपाल/अनिल काकडे 64-74; 6रेड स्नूकर एकेरी: राहुल बग्गा वि.वि.पंकज परमार 22-65, 36-35, 52-38);

मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स वि.वि. नील आणि ओबेरॉय किंग्ज 3-2(15 रेड स्नूकर एकेरी: प्रशांत राजघरिया वि.वि.निशांत मेहता 110-78; बिलियर्ड्स: राजीव खांडके पराभुत वि.संजय दिड्डी 106-200; रूलेट: रोहिंग्टन इराणी/संजय जाधव/राजीव खांडके/मुनीझ पुनावाला/प्रशांत राजघरिया वि.वि.निशांत मेहता/संजय दिड्डी/अनिश केरिंग/मंधीर आनंद/प्रणय माळगावकर 1-0; 9रेड स्नूकर दुहेरी: संजय जाधव/रोहिंग्टन इराणी वि.वि.अनिश केरिंग/प्रणय माळगावकर 76-40; 6रेड स्नूकर एकेरी: मुनीझ पुनावाला पराभुत वि.अनिल रघानी 11-39, 42-54);

मनीषा रॉयल्स वि.वि.दोराबजी टोरनॅडोज 3-2(15 रेड स्नूकर एकेरी: अयान खान पराभुत वि.जहांगीर दोराबजी 35-67; बिलियर्ड्स: आशीष खेरा पराभुत वि.नवीन कोचर 120-200; रूलेट: अयान खान/अश्रफ परवानी/कुणाल वासवानी/अश्रफ परवानी/योगेश अंकलेसारिया/आशिष खेरा वि.वि.जहांगीर दोराबजी/एफ.डी.मोदी/नवीन कोचर/विशाल अरोरा/सिद्धार्थ थडानी 3-2; 9रेड स्नूकर दुहेरी: अश्रफ परवानी/कुणाल वासवानी वि.वि.विमल/सिद्धार्थ थडानी 52-43; 6रेड स्नूकर एकेरी: योगेश अंकलेसारिया वि.वि.एफ.डी.मोदी 49-18, 49-16).