पुणे,19 फेब्रुवारी 2026 : द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन (पीबीएमए) आणि ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन (बीसीए) तर्फे एचसीएल फाऊंडेशनच्या सहकाऱ्याने आयोजित राष्ट्रीय टी20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेत अंतिम फेरीत संजोय दरवडा (49 धावा) गणेश भुसारा (44धावा),यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीसह माजी भरत (24धावा व 1-30) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर गुजरात संघाने कर्नाटक संघाचा 20 धावांनी पराभव करत विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना मैदानावर पार पडलेल्या या अंतिम फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने 20 षटकात 6 बाद 198 धावाचे आव्हान उभे केले. यात संजोय दरवडाने 27 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 49 धावा, गणेश भुसाराने 33 चेंडूत 44 धावा, माजी भरतने 24 धावा, अनिल गरियाने 20 धावा, हितेश पटेलने नाबाद 14 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.
या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटक संघ 20 षटकात 5 बाद 178 धावाच करू शकला. यात प्रभु हलियालने 52 चेंडूत 10 चौकारासह 75 धावा, तर रंगा एन ने 42 चेंडूत 7 चौकारासह 64 धावांची दिलेली लढत अपुरी ठरली. गुजरात संघाकडून रामभाई पारे (2-23), मनीष हडीया (1-44) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 20 धावांनी विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील विजेत्या गुजरात संघाला करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसंगी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त सत्यजीत बडे, पीबीएमएचे अध्यक्ष राजेश शहा, पीबीएमए च्या एच.व्ही देसाई आय हॉस्पिटल चे कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया, बीसीएचे अध्यक्ष रवी वाघ, माजी रणजी पटू मिलिंद गुंजाळ आणि एचसीएलफाऊंडेशनच्या सहयोगी संचालिका सिमी सुरी, एचसीएलटेकच्या क्लायंट डिलिव्हरी विभागाचे संचालक जनक लालन आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: अंतिम फेरी:
गुजरात: 20 षटकात 6 बाद 198 धावा (संजोय दरवडा 49(27, 5×4) गणेश भुसारा 44 (33), माजी भरत 24, अनिल गरिया 20, हितेश पटेल नाबाद 14, योगेश जे 2-21, सुब्रमनी मणी 1-52) वि.वि. कर्नाटक: 20 षटकात 5बाद 178धावा (प्रभु हलियाल 75(52, 10×4), रंगा एन 64(42,7×4), रामभाई पारे 2-23, मनीष हडीया 1-44, माजी भारत 1-30); सामनावीर – माजी भरत ; गुजरात संघ 20 धावांनी विजयी;
इतर पारितोषिके:
गणराज जाधव (बी1): 3 विकेट, महाराष्ट्र;
अनिल गरिया (बी2): 360धावा, गुजरात;
गणेश भुसारा (बी3): 281 धावा, गुजरात.

More Stories
पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत गरगंटू डिस्ट्रॉयर्स, के-प्रा पिकलर्स संघांची विजयी सलामी
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत सीएमएस फाल्कन्स, परशुरामियन्स एफसी, स्निग्मय पुणे एफसी, जीओजी एफसी संघांची विजयी सलामी
रुग्ण हक्क परिषदेच्या अध्यक्षपदी उमेश चव्हाण यांची फेरनिवड