March 7, 2026

पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत बीएम स्मॅशर्स, द बिग डिंक्स संघांचे विजय

पुणे, दि.7 मार्च, 2026 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत बीएम स्मॅशर्स, द बिग डिंक्स या संघांनी आपली विजयी मालिका कायम ठेवत आगेकूच कायम राखली.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील पिकलबॉल कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत बीएम स्मॅशर्स संघाने हुबळीकर हरिकेन्स संघाचा 5-3 असा पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. विजयी संघाकडून तनिश बेलगलकर, अनिकेत शिंदे, अरिन माळी, प्रतिक धर्माधिकारी, अभिजीत गानू, शान मदन, अभिजीत राजवडे, राधिका इंगळहळीकर, अमर श्रॉफ, सिद्धार्थ बदामीकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. दुसऱ्या लढतीत मिहिर ठोंबरे, नकुल ओगले, नंदन डोंगरे, सारंग आठवले,विनित राठी, भाग्यश्री देशपांडे, कौस्तुभ वाळिंबे, सौरभ प्रभुदेसाई, योगेश भोगाशेट्टी, सृष्टी खटोड, अयान जमेनिस, सुमीत कालकर यांच्या अफलातून खेळीच्या जोरावर द बिग डिंक्स संघाने गोल्ड लीफ हंटर्स संघाचा 6-2 असा पराभव करून आपली आगेकूच कायम राखली.

काल रात्री उशिरा झालेल्या लढतीत अनिश राणे, आर्यन सुतार, मिहिर ठोंबरे, नकुल ओगले, नंदन डोंगरे, सारंग आठवले, सृष्टी खटोड, योगेश भोगाशेट्टी, भाग्यश्री देशपांडे, अयान जेमेनिस यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर द बिग डिंक्स संघाने हुबळीकर हरिकेन्सचा 5-3 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. अन्य लढतीत बीएम स्मॅशर्स संघाने फाल्कन्स संघाचा 5-3 असा पराभव केला.

निकाल: साखळी फेरी:
बीएम स्मॅशर्स वि.वि.हुबळीकर हरिकेन्स 5-3 (खुला दुहेरी 1: तनिश बेलगलकर/अनिकेत शिंदे वि.वि.रणजित पांडे/वेदांत धाम 11-0; खुला दुहेरी 2: अरिन माळी/प्रतिक धर्माधिकारी वि.वि.अनुज छाजेड/अपूर्व सोनटक्के 11-01; खुला दुहेरी 3: अभिजीत गानू/शान मदन वि.वि.स्वरूप कुलकर्णी/जिनेश जैन 11-02; मिश्र दुहेरी 1: आर्यन शिरोळे/ईशा पाठक पराभुत वि.जान्हवी कोरे/रोहित भालेराव 09-11; वरिष्ठ दुहेरी:अमोल मेहेंदळे/जया पाटणकर पराभुत वि.राहुल पाठक/वेंकटेश कशेळीकर 09-15; मिश्र दुहेरी 2: अभिजीत राजवडे/राधिका इंगळहळीकर पुढे चाल वि. रुचा ढवळीकर/रौनक सावकर 15-00; खुला दुहेरी 4: रियान माळी/वेदांत खटोड पराभुत वि.नकुल बेलवलकर/अक्षय ओक 11-15; खुला दुहेरी 5: अमर श्रॉफ/सिद्धार्थ बदामीकर वि.वि.प्रतीक हुबळीकर/गायत्री नाटेकर 11-05);

द बिग डिंक्स वि.वि.गोल्ड लीफ हंटर्स 6-2 (खुला दुहेरी 1: अनिश राणे/आर्यन सुतारपराभुत वि. क्षितिज कोतवाल/आर्य देवधर 08-11; खुला दुहेरी 2: मिहिर ठोंबरे/नकुल ओगले वि.वि.अथर्व अय्यर/अश्विन लोणकर 11-00; खुला दुहेरी 3: नंदन डोंगरे/सारंग आठवले वि.वि.देवेन शेवाळे/सिद्धांत खिंवसरा 11-03; मिश्र दुहेरी 1: विनित राठी/भाग्यश्री देशपांडे वि.वि.अनुजा नवथे/समीर जालन 11-06; वरिष्ठ दुहेरी: कौस्तुभ वाळिंबे/सौरभ प्रभुदेसाई वि.वि.संदीप साठे/रचना कोतवाल 15-04; मिश्र दुहेरी 2: योगेश भोगाशेट्टी/सृष्टी खटोड वि.वि.आदित पाबळकर/गोपिका किंजवडेकर 15-10; खुला दुहेरी 4: अयान जमेनिस/सुमीत कालकर वि.वि.जय केळकर/चिराग गुजराती 15-11; खुला दुहेरी 5: अनय इंगळहळीकर/मीरा कशेळीकर पराभूत वि.रिवांश कासट/दिव्यांश गोरे 01-11)

द बिग डिंक्स वि.वि.हुबळीकर हरिकेन्स 5-3(खुला दुहेरी 1: अनिश राणे/आर्यन सुतार वि.वि.अपूर्व सोनटक्के/वेदांत धाम 11-03; खुला दुहेरी 2: मिहिर ठोंबरे/नकुल ओगले वि.वि. रौनक सावकर/स्वरूप कुलकर्णी 11-02; खुला दुहेरी 3: नंदन डोंगरे/सारंग आठवले वि.वि.अनुज छाजेड/जीनेश जैन 11-02; मिश्र दुहेरी 1: शाल्वी शाह/विनित राठी पराभुत वि.जान्हवी कोरे/रोहित भालेराव 07-11; वरिष्ठ दुहेरी: कौस्तुभ वाळिंबे/सौरभ प्रभुदेसाई पराभुत वि. रणजित पांडे/राहुल पाठक 11-15; मिश्र दुहेरी 2: सृष्टी खटोड/योगेश भोगाशेट्टी वि.वि.रुचा ढवळीकर/कुणाल शहा 15-08; खुला दुहेरी 4: भाग्यश्री देशपांडे/अयान जेमेनिस वि.वि.नकुल बेलवलकर/अक्षय ओक 15-12; खुला दुहेरी 5: आरव श्रॉफ/आनंद आपटे पराभुत वि.प्रतिक हुबळीकर/गायत्री नाटेकर 06-11);

बीएम स्मॅशर्स वि.वि.फाल्कन्स 5-3 (खुला दुहेरी 1: तनिश बेलगलकर/अनिकेत शिंदे वि.वि. चैतन्य रहातेकर/अंकुश मोघे 11-02; खुला दुहेरी 2: आरिन माळी/प्रतिक धर्माधिकारी वि.वि.रोहन छाजेड/कमलेश निंबाळकर 11-10; खुला दुहेरी 3:अभिजीत गानू/शान मदन वि.वि.इशान पारेख/तनिश ददलानी 11-03; मिश्र दुहेरी 1: आर्यन शिरोळे/राधिका इंगळहळीकर पराभुत वि.गौतम लोणकर/मधुरा टेंबे 04-11; वरिष्ठ दुहेरी : अमोल मेहेंदळे/जया पाटणकर वि.वि.सुदर्शन बिहानी/अनिल छाजेड 15-11; मिश्र दुहेरी 2: अभिजित राजवाडे/ईशा पाठक पराभुत वि.आरुषी पांडे/आर्यन चंगेडिया 14-15; खुला दुहेरी 4: रियान माळी/वेदांत खटोड वि.वि.शुभम प्रभू/सत्यजित निंबाळकर 15-14; खुला दुहेरी 5: अमर श्रॉफ/सिद्धार्थ बदामीकर पराभुत वि. मनन जोशी/आर्यन देसाई 10-11)