April 4, 2026

तिसऱ्या पुसाळकर फाउंडेशन पुरस्कृत पुणे पिकलबॉल साखळी स्पर्धेत एकुण 110 खेळाडू सहभागी

पुणे, दि.1 एप्रिल, 2026 – एबीए कप यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पुसाळकर फाउंडेशन पुरस्कृत पुणे पिकलबॉल साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात अनुज भावे(4100पॉईंट्स, वाईल्ड वुल्व्हस), पियुष गायकवाड(3600पॉईंट्स, एस एलिगेटर्स), कुलदीप रुचंदानी(3150पॉईंट्स, ब्लेझिंग चिताज)हे खेळाडू महागडे ठरले आहेत. ही स्पर्धा 4 ते 5 एप्रिल 2026 या कालावधीत डिंक पिकलबॉल एरिना, हिंजेवाडी येथे होणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक सुधांशु मेडसीकर यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. स्पर्धेला पुसाळकर ग्रुप यांचे प्रायोजकत्व, तर शंतनू पायल फाउंडेशन यांचे सह प्रायोजकत्व लाभले आहे.

स्पर्धेत 110 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धकांची निवड लिलाव पध्दतीने एकूण 10 संघांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

स्पर्धेत 10 संघांमध्ये एस एलिगेटर्स, ब्लेझिंग चिताज, फाल्कन फुरी, गोल्डन इगल्स, लॉब लायन्स, रेजिंग रायनोज, रॉयल टायगर्स, स्मॅशिंग शार्क्स, टकर टायटन्स वाईल्ड वुल्व्हस यांचा समावेश आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात येणार आहे.