पुणे, 8 एप्रिल, 2026: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात विद्यांचल, महाराष्ट्र मंडळ, सेंट मेरीज यांनी तर, मुलांच्या गटात एसएसबीए, डेक्कन जिमखाना अ, नहाटा, सीबीसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना बास्केटबॉल कोर्ट या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत गट साखळी फेरीत मुलींच्या गटात क गटात विद्यांचल संघाने सिटी प्राइड स्कूल निगडी संघाचा 38-09 असा पराभव केला. विजयी संघाकडून
हेतवी अमीन(13गुण), लक्ष्मी जोशी(11गुण) यांनी सुरेख खेळी केली. ड गटात श्रुवी जैन 10गुण, साक्षी व्यास 10गुण)यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र मंडळ संघाने शार्प शूटर्स संघावर 52-11 असा विजय मिळवला. अ गटात सेंट मेरीज संघाने साई स्पोर्टस संघाचा 83-21 असा धुव्वा उडवला. सेंट मेरीज संघाकडून ईशल राठोड(21गुण), आर्णा कल्याणी(18गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
मुलांच्या गटात अ गटात डेक्कन अ संघाने सेंट मेरीज संघाचा 59-17 असा पराभव केला. विजयी संघाकडून विहान येणपुरे(13गुण), आर्यन प्रजापती(10गुण) यांनी अफलातून खेळी केली. क गटात एसएसबीए संघाने विद्या व्हॅली संघाचा 54-14 असा पराभव करून आगेकूच केली. तनरिका चक्रवर्ती(17गुण), अनुशा सोनटक्के(15गुण) यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन जिमखाना अ संघाने एसजी अकादमी संघाचा 70-21 असा पराभव करून आगेकूच कायम राखली.
निकाल: गट साखळी फेरी:
मुली:
गट अ: डेक्कन जिमखाना अ: 70(तनरिका चक्रवर्ती 17गुण, अनुशा सोनटक्के 15गुण) वि.वि.एसजी अकादमी: 21(भक्ती जांभळे 6गुण); मध्यंतर: 40-08;
गट क: विद्यांचल: 33(लक्ष्मी जोशी 10गुण, लिली जेकब 10गुण) वि.वि.एमएसडी अकादमी: 26(कनिष्का गायकवाड 10pts); मध्यंतर: 19-13;
गट अ: सेंट मेरीज: 83(ईशल राठोड 21गुण, आर्णा कल्याणी 18गुण) वि.वि.साई स्पोर्टस: 21(माही शिंदे 9गुण); मध्यंतर: 43-06;
गट क: विद्यांचल: 38(हेतवी अमीन 13गुण, लक्ष्मी जोशी 11गुण)वि.वि. सिटी प्राइड स्कूल निगडी: 9(युक्ता देशमुख 7गुण); मध्यंतर: 22-08;
गट ड: महाराष्ट्र मंडळ: 52(श्रुवी जैन 10गुण, साक्षी व्यास 10गुण) वि.वि.शार्प शूटर्स: 11(दुर्गा भागवत 6गुण); मध्यंतर: 34-08;
मुले:
गट क: एसएसबीए: 54(आयुष संघवी 13गुण, अभ्युदय ए 8गुण) वि.वि.विद्या व्हॅली: 14(मयंक लोढा 5गुण); मध्यंतर: 47-08
गट अ: डेक्कन अ: 59(विहान येणपुरे 13गुण, आर्यन प्रजापती 10गुण) वि.वि. सेंट मेरीज: 17(अयान रॉय 6गुण); मध्यंतर: 32-06;
गट ब: नहाटा: 62(समर भुजबळ 14गुण, शर्विल हुबळीकर 10गुण) वि.वि.डेक्कन जिमखाना ब: 22(सिद्धांत कचरे 5गुण); मध्यंतर: 35-15;
गट ब: विद्यांचल: 50(शौर्य दळवी 18गुण, युवराज सुतार 13गुण) वि.वि.एसजी अकादमी: 44(हर्षद पवार 21गुण); मध्यंतर: 20-16;
गट ड: सीबीसी: 27(श्रीतेज मारवाडी 8गुण)वि.वि.ग्राउंड अप: 11(कलांजी 5गुण); मध्यंतर: 13-07;

More Stories
चौथ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2026 स्पर्धेत आठ संघ सहभागी
घराणेदार गायनाने रंगला कलाश्री संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत फातिमा इलेव्हन, युकेएम कोथरूड एफसी, आयफा संघांची विजयी आगेकूच