पुणे, १० एप्रिल २०२६ : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीवर शहराची ओळख अधिक ठळक करण्यासाठी विविध ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने आज मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्पात काही समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रवेशद्वार जाहीर केले होते. आज स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयामुळे शहराच्या प्रमुख सीमांवर भव्य प्रवेशद्वार उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरात प्रवेश करताना पुण्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आधुनिक ओळख अधोरेखित करण्यासाठी आकर्षक व सुबक प्रवेशद्वार उभारले जाणार आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
स्थायी समितीच्या या निर्णयामुळे पुण्याच्या सर्व प्रमुख सीमांवर टप्प्याटप्प्याने प्रवेशद्वार उभारले जाणार असून, शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार आहे.

More Stories
तुकाराम ओंबाळे यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक: पोलीस आयुक्त अमितेश कुमार
‘डीजेच्या वादात पडू नका’; सांस्कृतिक गणेशोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
डीजेनंतर आता ढोल-ताशांवरही बापट यांचा आक्षेप; ‘परंपरेच्या नावाखाली ध्वनिप्रदूषणाचे समर्थन नको’