June 19, 2026

पाचव्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत गोल डिगर्स एफसी संघाची विजयी आगेकूच

पुणे, 17 जुन 2026: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित पाचव्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत साखळी फेरीत वरिष्ठ गटात गोल डिगर्स एफसी संघाने सलग तिसऱ्या विजयासह आपली आगेकूच कायम राखली.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लब येथील फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत तिसऱ्या दिवशी पहिल्या लढतीत गोल डिगर्स एफसी संघाने ओझा स्ट्रायकर्स संघाचा 5-1 असा सहज पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. विजयी संघाकडून वेदांत गुप्ता(11, 21मि.) याने दोन गोल, तर, यश भिडे(14मि.), अनुज मेहता(19मि.), चिनार ओक(24मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पराभूत संघाकडून तनिष दादलानी(26मि.)एकमेव गोल केला.

दुसऱ्या लढतीत विश्व रुकारी(7,14, 17मि.)याने केलेल्या हॅट्ट्रिक कामगिरीच्या जोरावर रावेतकर टायटन्स संघाने पीएच ग्लॅडिएटर्स संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. पीएच ग्लॅडिएटर्स संघाकडून सिद्धार्थ भोळे(5, 12मि.)याने दोन गोल केले.

निकाल: साखळी फेरी: वरिष्ठ गट:
गोल डिगर्स एफसी: 5(वेदांत गुप्ता 11, 21मि., यश भिडे 14मि., अनुज मेहता 19मि., चिनार ओक 24मि.) वि.वि.ओझा स्ट्रायकर्स: 1(तनिष दादलानी 26मि.)

रावेतकर टायटन्स: 3(विश्व रुकारी 7,14, 17मि.)वि.वि.पीएच ग्लॅडिएटर्स:2(सिद्धार्थ भोळे 5, 12मि.)