पुणे, 23 जुलै 2026: पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पाचव्या पीवायसी कॅरम लीग स्पर्धेत 74 खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. 25 ते 26 जुलै 2026 रोजी पीवायसी जिमखाना येथील कॅरम संकुलात ही स्पर्धा रंगणार आहे.
आम्ही पीवायसी हिंदू जिमखाना येथे विविध क्रीडाप्रकारांच्या लीग स्पर्धा आयोजित करीत असतो. सलग पाचव्या वर्षी सभासदांसाठी कॅरम लीग स्पर्धा आयोजित करताना आम्हांला आनंद होत आहे, असे पीवायसीचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव दिपक गाडगीळ यांनी सांगितले.
क्लबचे सचिव सारंग लागू म्हणाले, की आम्ही सभासदांचे आरोग्य व मनोरंजनासाठी विविध प्रकारे प्रयत्न करीत असतो. कॅरम लीगमुळे सभासदांना एका व्यासपीठावर येण्यास, तसेच कॅरमसारख्या खेळाच्या माध्यमातून परस्पर नातेसंबंध दृढ होण्यास साहाय्य होणार आहे.
पुढे माहिती देताना कॅरम विभागाचे सचिव शिरीष साठे म्हणाले की, या लीगमध्ये सहा संघ भाग घेणार आहेत संघांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: अतुल पॉकेट्स, डेलकन्स फिनिशर्स, जोग व्हिक्टर्स, वाडेश्वर विझार्ड्स, व्हीवाय स्ट्रायकर्स व श्रीनिकेत कॅरम टायटन्स.
लिलावात मंदार देवगांवकर(अतुल पॉकेट्स, 4800पॉईंट्स) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. नंदन डोंगरे यांची स्पर्धा संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

More Stories
गिरिप्रेमीतर्फे सर्व महिला माऊंट मेंन्टॉक कांग्री-II मोहिमेच्या सदस्यांचा सन्मान
विनायकी क्रीडा महोत्सवानिमित्त खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत 250खेळाडू सहभागी
२०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघात महाराष्ट्राच्या ऋतुजा पिसाळची निवड