पुणे, 25 जुलै 2026: माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित विनायकी क्रीडा महोत्सव खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत जिल्ह्यातून 250खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा पेरी डॉट हॉल, सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड या ठिकाणी ही स्पर्धा 26 जुलै 2026 रोजी रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, “कै. विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विनायकी क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्याचा आणि युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. रोलर स्केटिंग स्पर्धेला पुणे जिल्ह्यातील खेळाडूंचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे. या स्पर्धेमुळे युवा स्केटर्समध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांना भविष्यात जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची प्रेरणा मिळेल. विनायकी क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुण्यातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”
स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वेश पाटील, विक्रम इंगळे, सिद्धार्थ कांबळे, सुरुड सुर्वे यांचा समावेश आहे. तसेच, हि एकदिवसीय स्पर्धा तीन प्रकारात मुले व मुलींच्या
6 वर्षावरील ते 18 वर्षांपर्यंत वयोगटात रंगणार आहे. यामध्ये क्वॉड, रिक्रीएशनल इनलाइन आणि प्रोफेशनल इनलाइन या प्रकाराबरोबरच लहान मुलांच्या प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी शिव छत्रपती पुरस्कार विजेते अशोक गुंजाळ हे चीफ रेफ्री म्हणून काम पाहणार आहे.स्केटिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पुष्कर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडत आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तिपत्रक आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला पदके, टी शर्ट देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटनसोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व नगरसेवक सनी निम्हण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्पर्धा समन्वयक अभिजीत मोहिते उपस्थित राहणार आहेत.

More Stories
गिरिप्रेमीतर्फे सर्व महिला माऊंट मेंन्टॉक कांग्री-II मोहिमेच्या सदस्यांचा सन्मान
पाचव्या पीवायसी कॅरम लीग स्पर्धेत 74 खेळाडू सहभागी
२०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघात महाराष्ट्राच्या ऋतुजा पिसाळची निवड