पुणे, २९ जुलै २०२६ : बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र (बीईजी), खडकी येथे युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत अग्निवीर (जनरल ड्युटी), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर (ट्रेड्समन – १० वी व ८ वी उत्तीर्ण) तसेच अग्निवीर खेळाडू (खुला श्रेणी) या पदाकरिता अग्निवीर भरती मेळाव्याचे १० ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
भरती मेळाव्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे: ३१ जुलै २०२६ रोजी खेळाडूंची तपासणी करण्यात येणार आहे. १० ऑगस्ट रोजी अग्निवीर (सामान्य कर्तव्य) – मराठा प्रवर्ग, ११ ऑगस्ट रोजी अग्निवीर (सामान्य कर्तव्य) – शीख (मजहबी व रामदासी), एम अँड आर तसेच मुस्लिम प्रवर्ग, अग्निवीर (स्टोअर कीपर/ऑफिस असिस्टंट), अग्निवीर (ट्रेड्समन – ८ वी व १० वी उत्तीर्ण) आणि विविध सपोर्ट स्टाफ पदांसाठी भरती प्रक्रिया होईल. १२ ऑगस्ट रोजी अग्निवीर खेळाडू (खुला प्रवर्ग) भरती होणार आहे.
भरती प्रक्रियेदरम्यान पात्र उमेदवारांची प्रारंभिक तपासणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मापन, कागदपत्रांची पडताळणी व संगणक नोंदणी करण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी संबंधित दिवशी सकाळी 5 ते 8 या वेळेत नंदा गेट, बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र, खडकी येथे उपस्थित राहावे. सकाळी ८ नंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही. अग्निवीर खेळाडू (खुला वर्ग) भरतीसाठी फुटबॉल, पोहणे, हॉकी, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, रोईंग, बॉक्सिंग, कबड्डी, बास्केटबॉल, कुस्ती, हँडबॉल, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक्स आदी क्रीडा प्रकारांतील पात्र खेळाडूंना संधी उपलब्ध आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती, पात्रता, सेवा अटी व इतर तपशीलांसाठी उमेदवारांनी www.bsakirkee.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस फिरासत (नि) पुणे यांनी केले आहे.

More Stories
अन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडीवर महापौर आक्रमक; पोलिसांना १५ दिवसांचा अल्टिमेटम
Pune: कनिष्ठ अभियंते कार्यालयात बसून काय करतात ? महापालिका आयुक्त भडकले