पुणे, २४आॅगस्ट २०२६ ः महापालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत जलवाहिन्या, पंपिंग आणि विद्युतविषयक देखभाल-दुरुस्तीची कामे गुरुवारी (ता.२७) केली जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी पश्चिम पुण्यासह शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. २८) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा परिसर ः पाषाण व सूस गोल टाकी परिसर, कर्वे नगर, जुने वारजे जलकेंद्र भाग, कोंढवे धावडे जलकेंद्र या जलकेंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये पाणी पुरवठा होणार नाही. सहकानगर, पद्मावती, बिबवेवाडी, महर्षीनगर, अप्पर इंदिरानगर, गिरिधर भवन ठाकरे वसाहत, कोंढवा खुर्द आदी परिसर, भामा आसखेड अंतर्गत येणारा लोहगाव, कळस, धानोरी, विमाननगर, कल्याणीनगर, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, खराडी, येरवडा, फुलेनगर. एसएनडीटी केंद्राअंतर्गत येणारा औंध, बोपोडी, गोखलेनगर, बाणेर रोड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विधी महाविद्यालय रस्ता, भोसलेनगरस, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, पौड रोड, करिष्मा सोसायटी परिसर, मयूर कॉलनी परिसर, कर्वे रोड, नवसह्याद्री, ताथवडे उद्यान, दशभुजा गणपती ते नळस्टॉप परिसर, चांदणी चौक टाकी परिसरातील पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, बावधन, उजवी व डावी भुसारी कॉलनी, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पूण पाषाण, सूस रोड आदी, पॅन कार्ड रोड परिसरातील बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, पॅनकार्ड क्लब रोड, मुळा रोड, खडकी, कॅन्टोन्मेंट, एचई फॅक्टरी, आंबेगाव खुर्द व बुद्रुक, राजस सोसायटी, सुखसागर नगर, कात्रज गावठाण, दत्तनगर, बालाजी नगर, वंडर सिटी, वरखेडेनगर, येवलेवाडी आदी.

More Stories
डीजे बंदीवरून गणेश मंडळांचा गोंधळ; सत्ताधारी, प्रशासनाची नमती भूमिका!
४० शाळांमधील ६३० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रतिकृती तयार करत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली
निधीवाटपावरून महायुतीत धुसफूस; टिंगरेंचे फडणवीसांना पत्र