पुणे, 24 ऑगस्ट, 2026: पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स 19 वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात भारताच्या जागतिक क्रमवारीत 8 व्या स्थानी असलेल्या देव रुपारेलिया याला तर, मुलींच्या गटात लक्ष्या राजेश हिला अग्रमानांकन देण्यात आले आहे. हि स्पर्धा पी.ई.सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये 25 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत रंगणार आहे.
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) चे मानद सर चिटणीस सीए रणजीत नातु म्हणाले की, “सुशांत चिपलकट्टी हा प्रतिभावान बॅडमिंटनपटू होता. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा बॅडमिंटनपटूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी स्पर्धा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. स्पर्धेत भारत, युएइ, अमेरिका, इंडोनेशिया, थायलंड, नेपाळ, मलेशिया, नेदरलँड, भूतान या 9 देशातील 304 खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून देशातील विशेषतः राज्यातील खेळाडूंना व प्रेक्षकांना त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.
तसेच, हि स्पर्धा 19 वर्षांखालील मुले व मुली एकेरी, 19 वर्षांखालील मुले व मुली दुहेरी गट आणि मिश्र अशा पाच गटात पार पडणार आहे. विशेष म्हणजे याआधीच्या मालिकेत सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, सात्विक साईराज, श्रीकांत किदांबी, प्रियांशु राजावत, चिराग शेट्टी हे नामांकित भारतीय बॅडमिंटनपटूदेखील सहभागी झाले होते. स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने 25 ऑगस्ट 2026 रोजी होणार असून मुख्य ड्रॉ फेरीच्या सामन्यांना 26 ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेचे अंतिम फेरीचे सामने 30 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहेत.
स्पर्धेत एकूण 15,000 डॉलर रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या खेळाडूला करंडक 1208 डॉलर, उपविजेत्या खेळाडूला करंडक व 724.80 डॉलर अशी पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या उपुल गमलत चीफ रेफ्री म्हणून, भारताच्या उदय साने हे डेप्युटी चीफ रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुख्य ड्रॉ मधील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
मुले: 1. देव रुपारेलिया (भारत), 2. जगशेर सिंग खंगुर्रा(भारत), 3. साई भत्राजू(भारत), 4. सॅम्युअल तमंग(भारत), 5. श्रीयंस भागवतुल(अमेरिका), 6.आदित्य किरण(यूएई), 7.प्रणव मंजुनाथ(भारत), 8. अखिल रेड्डी बोब्बा(भारत);
मुली: 1. लक्ष्या राजेश(भारत), 2. इशिता नेगी(भारत), 3. दिशा संतोष(भारत), 4. प्रांजला निसर्गा(भारत), 5.दीक्षा सुधाकर(भारत), 6. राधा गाडगीळ(भारत), 7.हसाना श्री मल्लवरपू(भारत), 8. बाला मान्विथा रेड्डी अल्लम(भारत);
मुले दुहेरी: 1. ऋषव नगंगॉन/क्योवेयो मंग्सुआन वेमाई(भारत), 2. संदीप कुमार आर/विशांक सुरेंद्र(भारत), 3. योगांश सिंग/आथिश श्रीनिवास पीव्ही(भारत), 4.चरण राम थिप्पाना/हरी वीररामरेड्डी(भारत);
मुली दुहेरी: 1. आन्या भट/एंजल पुणेरा(भारत), 2. अदिती राज/पोनम्मा बी.व्ही. वृद्धी(भारत), 3. लक्ष्मी रिद्धिमा देविनेनी/अंजना मणिकंदन(भारत), 4. दिया भीमैया/कीर्ती मंचला(भारत);
मिश्र दुहेरी: 1. मोहम्मद नफीज रफी/दक्षा बिंदू(भारत), 2. योगांश सिंग/वर्णा प्रभुनंद(भारत), 3. वंश देव/अन्या बिश्त(भारत), 4. हरिशरागवेंद्रन व्ही/जननिका रमेश (भारत).

More Stories
तिसऱ्या पीवायसी स्नुकर अँड बिलियर्डस लीग स्पर्धेत 58 खेळाडू सहभागी
एफएचएस होलिस्टिको रन स्पर्धेत अमित पाटील, नीता सलामे, अरविंद यादव, शकीला वसावे यांना विजेतेपद
गिरिप्रेमीतर्फे सर्व महिला माऊंट मेंन्टॉक कांग्री-II मोहिमेच्या सदस्यांचा सन्मान