पुणे, 19/9/2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त रविवार पेठेतील संत नामदेव चौकात २० फूट बाय २० फूट आकाराची भव्य रांगोळी काढून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. लोककल्याण प्रतिष्ठान, प्रल्हाद गवळी मित्र परिवार आणि भाजप पुणे शहर यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात ७६ दिवे पेटवून आणि ७६ किलो पेढ्यांचे वाटप करून वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
रविवार पेठेतील संत नामदेव चौकात काढण्यात आलेल्या भव्य रांगोळीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रांगोळीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी रांगोळीचे कौतुक करत उपक्रमाला प्रतिसाद दिला. ही रांगोळी पाच दिवस पुणेकरांना पाहता येणार आहे.
या उपक्रमास नगरसेवक राजेंद्र काकडे, भाजप राष्ट्रीय लीगल सेल कमिटीचे सदस्य ॲड. हिरसिंग राजपुरोहित, मंडल अध्यक्ष छगन बुलाखे, सरचिटणीस माधव साळुंके, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुनील खंडागळे, उपाध्यक्ष प्रशांत बढाई, अजय बढाई, विलास सिन्नरकर, साईनाथ चकोर, प्रशांत बल्ला, आदेश अवघडे, सोनाली थोपटे, विकास गवळी, विक्रम लगड आदी उपस्थित होते.
“वाढदिवसाच्या निमित्ताने २० फूट बाय २० फूट आकाराची रांगोळी काढून आनंदोत्सव साजरा केला. ७६ दिवे पेटवून आणि ७६ किलो पेढे वाटून नागरिकांसोबत हा आनंद द्विगुणित झाला. वाढदिवस केवळ औपचारिक न ठेवता सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमातून साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांचे प्रेम, सहकार्य आणि उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला,” अशी भावना आयोजक प्रल्हाद गवळी यांनी व्यक्त केली. ‘मूर्ती तुमची, किंमत तुमची’ या उपक्रमांतर्गत नुकतेच पाच हजार गणपती मूर्तींचे वाटप करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

More Stories
पुणे गणेशोत्सव २०२६ : विसर्जनापूर्वी १,५०० हून अधिक ढोल-ताशा वादकांना ‘संजीवनी’चे सीपीआर प्रशिक्षण
सिटीप्राईड सिनेमागृहाला ११.२० लाखांचा दंड! विनापरवाना होर्डिंग्ज लावल्याचो प्रकरण भोवले
पुणे ड्रग्ज प्रकरण: काश्मीरमधील MBBS डॉक्टरसह पाच जणांना अटक; Rs ८.५ लाखांचे एमडी जप्त