पुणे, २८/०२/२०२३ : येरवड्यातील वाहतूक पोलीस विभागाच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी मोटार तसेच दोन दुचाकींचे टायर चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत पोलीस कर्मचारी सावता माळी यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माळी येरवडा पोलीस ठाण्यात मुद्देमाल कक्षात कारकून आहेत. गोल्फ क्लब रस्त्यावर वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारातील मोकळ्या जागेत येरवडा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेली वाहने लावली आहेत. चोरटे वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत शिरले. चोरट्यांनी वाहतूक विभागाच्या कार्यालयात ठेवलेली एक मोटार आणि दोन मोटारीचे टायर लांबविले. पोलीस अंकुश डोंबाळे तपास करत आहेत.
More Stories
Pune: महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार
Pune: बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा मार्ग झाला मोकळा
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा