October 16, 2025

पुणे: आवजाचे उल्लंघन केल्याप्रकरणी डेझर्ट वॉटर रेस्टारंटवर कारवाई, १ लाख १० हजारांचे साउंड जप्त

पुणे, दि. १२/०३/२०२३: नियमांचे उल्लंघन करीत रात्री दहा वाजेनंतर मोठमोठ्या आवजात संगीत वाजवणाऱ्या  कोरेगाव पार्क परिसरातील  डेझर्ट वॉटर रेस्टारंट अॅण्ड बार यांच्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर केले जप्त. तेथील १ लाख १० हजारांचे साउंड जप्त केले आहे
सामाजिक सुरक्षा विभागातल पोलीस अधिकारी कर्मचारी कोरेगाव पार्क परीसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळेस  डेझर्ट वॉटर रेस्टारंट अॅण्ड बार मध्ये मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे पथकाचया निदर्शनास आले.

डेझर्ट वॉटर रेस्टारंट अॅण्ड बार कोरेगाव पार्क,पुणे येथे मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमवर संगीत सुरू असल्याचे आढळल्याने त्हॉटेलवर कारवाई करून  पथकाने  साऊंड सिस्टिम जप्त केली. हॉटेलचे मालक व मॅनेजर यांचे विरूध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २०००) अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी जप्त मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) कोरेगांव पार्क पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त,रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक  विनायक गायकवाड , सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार,अजय राणे, जमदाडे व कोळगे यांच्या पथकाने केली आहे.

You may have missed