September 17, 2024

वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

पुणे,  13 मार्च 2023 : पुणे शहरात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १०० मुले व १०० मुलींच्या वसतिगृहासाठी दोन इमारती भाड्याने घेण्यात येणार असून त्यासाठी खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी एक वसतिगृह सुरू केले जाणार आहे. इच्छुकांनी पाचशे रूपयाच्या बंधपत्रावर मालकाचे इमारत भाड्याने देण्याबाबत संमतीपत्र, इमारतीचा तपशील, खोल्या, स्वच्छतागृह, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आदी बाबी नमूद कराव्यात.

इच्छुकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हेक्षण क्रमांक १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर समोर, येरवडा, पुणे-६ (दूरध्वनी ०२०-२९७०६६११) येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.