पुणे, दि. १६/०३/२०२३- महापालिकेकडील करआकारणी थकित प्रकरणी जप्तीचे वॉरंट घेउन गेलेल्या विभागीय कर निरीक्षकाला धक्काबुक्की करीत एकाने शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना १५ मार्चला पावणेबाराच्या सुमारास कोंढव्यातील मॅजिस्टीक व्हिला याठिकाणी घडली.
रफिक शेख (वय ४५ रा. कोंढवा खुर्द ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विभागीय कर निरीक्षक राजेंद्र वाघचौरे (वय ४९ ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे .
फिर्यादी राजेंद्र वाघचौरे हे महापालिकेतील कर आकारणी व कर संकलन विभागात निरीक्षक आहेत. कर थकविल्याप्रकरणी ते १५ मार्चला ते मॅजिस्टीक व्हिला याठिकाणी आरोपी रफिक शेख याला जप्तीचे वॉरंट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने वाघचौरे यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली. त्यांना बघून घेण्याची धमकी देत घरावर चिटकवलेले वॉरंट महिलेला फाडून टाकण्यास सांगितले. पोलीस उपनिरीक्षक एच.एच. शेख तपास करीत आहेत.

More Stories
Pune: पथारी व्यावसायिकांसाठी अभय योजनेचा प्रस्ताव
शिवरायांचा अपमान; सरकार गप्प! बागेश्वर बाबाविरोधैत काॅंग्रेसचे आंदोलन
Pune: टॅंकर भरले ५०; नोंद फक्त १८; पटवर्धन बागेतील भरणा केंद्रात मोठा घोळ