पुणे, ०९/०६/२०२३: मार्केट यार्डातील भुसार बाजारातील एका व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या भुसार मालाचे पैसे न देता चार कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका व्यापाऱ्याविरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी शमीत शशिकांत बंब (वय ३५, रा. मार्केट यार्ड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यापाऱ्याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यापाऱ्याची भुसार बाजारात पेढी आहे. बंब याने व्यापाऱ्याकडून साखर, मीठ, तेल डबे असा माल खरेदी केला होता. बंब याने भुसार व्यापाऱ्याला रोख, ऑनलाइन स्वरुपात रक्कम दिली होती. उर्वरित चार कोटी ४२ लाख पाच हजार ५७८ रुपये दिले नव्हते. भुसार व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या मालाची विक्री अन्य व्यापाऱ्यांना करुन बंब याने रक्कम परत केली नाही. भुसार व्यापाऱ्याने रक्कम परत करण्याबाबत बंबकडे विचारणा केली. तेव्हा त्याने उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली.
त्यानंतर व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली. फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी बंबविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही