पुणे, ११/०८/२०२३: बाणेर रस्त्यावरील ग्रीन पार्क हाॅटेल चौक ते पल्लोड फार्म रस्त्यावर मेट्रोच्या कामासाठी शनिवारपासून (१२ ऑगस्ट) तीन दिवस वाहतूक बदल करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत बाणेर रस्त्यावर वाहतूक बदल लागू करण्यात आले असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
पुणे विद्यापीठ चौकाकडून (आचार्य आनंदऋषीजी चौक) अभिमानश्री सोसायटी चौकातून बाणेरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी बाणेर फाटा चौकातून उजवीकडे वळून आयटीआय रस्त्यावरील परिहार चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून नागरस रस्ता, महाबळेश्वर हाॅटेलजवळून वाहनचालकांना बाणेर रस्त्यावर जाता येईल. ग्रीन पार्क हाॅटेल चौकातून डावीकडे वळण घेऊन सोमेश्वर मंदिरमार्गे रामनदीवरील पुलावरुन उजवीकडे वळण घेऊन वाहनचालकांनी पासपोर्ट कार्यालयासमोरुन बाणेर रस्त्यावर यावे. तेथून इच्छितस्थळी जावे.
१२ ते १५ ऑगस्ट दरम्यान ग्रीन पार्क हाॅटेल चौक ते महाबळेश्वर हाॅटेलकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

More Stories
Pune: एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा
कचरा प्रक्रिया प्रकल्प ठप्प; शहरात ३०० ते ४०० टन अतिरिक्त कचऱ्याची समस्या
महापालिकेची मालमत्ता पुढाऱ्यांची जहागीरीसाठी २६ वर्षे जुना निर्णय रद्द