पुणे, २५/०८/२०२३: मोटारचालकाने पीएमपी चालकाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अमोल लोंढे (वय २०, रा. संकेत विहार, हडपसर) असे गु्न्हा दाखल केलेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. याबाबत पीएमपी चालक तुषार डोंबाळे (वय ३५, रा. सोरटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी हडपसर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर भागातील संकेत विहार सोसायटीसमोर मोटारचालक लोंढेने अचानक मोटार बससमोर थांबविली. बस मागे घे, असे सांगून लोंढेने पीएमपी चालक डोंबाळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोंढे पीएमपी बसमध्ये शिरला. त्याने पीएमपी चालक डोंबाळे यांना मारहाण केली.
डोंबाळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुशील डमरे तपास करत आहेत.

More Stories
पुणेकर कलारसिकांना होणार देशभरातील हस्तकला व संस्कृतीचे होणार दर्शन
नवीन पुनर्विकास शासन निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता येणार – सुहास पटवर्धन
पाणी कपातीमुळे २.३० टीएमसी पाण्याची बचत, दुष्काळात ३७ दिवसाचा पाणीसाठा उपयोगी