पुणे, दि. ११/०९/२०२३: इमारतीच्या बांधकामावेळी कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना न केल्यामुळे एकाचा जीव गेला आहे. तिसर्या मजल्यावर सुरु असलेल्या बांधकामावेळी मजूराच्या डोक्यात सळई पडून त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना २८ ऑगस्टला दुपारी एकच्या सुमारास मांजरी बुद्रूक परिसरातील मांजराई व्हिलेज याठिकाणी घडली.
विठ्ठल गडदे (वय २९, रा. शेवाळवाडी, हडपसर ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. अशोक किसन शिंदे (वय ५५) असे गुन्हा दाखल केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी वर्षा गडदे (वय २९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी बुद्रूक परिसरात इमारतीचे बांधकाम सुरु होते. त्यासाठी आरोपी अशोक शिंदे याने ठेका घेतला होता. मात्र, मजूरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्याने कोणतीही उपाययोजना केली नव्हती. त्यामुळे २८ ऑगस्टला कामावर विना हेल्मेट असलेल्या विठ्ठलच्या डोक्यात लोखंडी सळई पडून गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी निष्काळजीपणा बाळगल्याप्रकरणी ठेकेदार अशोक शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करीत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही