पुणे, दि. ११/०९/२०२३: शहरानजीक लोणी-काळभोर पोलीस ठाणे परिसरात हातभट्टी चालविणार्या महिलेविरुद्ध एमपीडीएनुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. एक वर्षासाठी तिची कोल्हापूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीएनुसार केलेली ही ४१ वी कारवाई आहे.
सरस्वती संतोष राठोड (वय-३६ रा.काळेशिवार, शिंदवणे, हवेली) असे स्थानबद्ध केलेल्या महिलेचे नाव आहे. तिने साथीदारांसह लोणी काळभोर हद्दीत गावठी हातभट्टी दारु तयार करणे, विक्रीसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. तिच्याविरुद्ध ४ गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी तिच्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी संबंधित महिलेला एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, ए. टी. खोबरे, यांनी कामगिरी पार पाडली.
आतापर्यंत ४१ सराईत स्थानबद्ध
शहरात दहशत निर्माण करणा-या तसेच अवैध बेकायदेशीर हातभट्टी दारु-ताडी निर्मीती व विक्री करणार्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यानंतरची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची केलेली ही ४१ वी कारवाई आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
More Stories
पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘दगडूशेठ’ गणपतीची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता मार्गस्थ