पुणे, 22 सप्टेंबर 2023: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी व सोलींको प्रायोजित 8,10वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए मानांकन प्रेसिडेन्सी ज्युनियर ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा प्रेसिडेन्सी फेडल टेनिस अकादमी, विमाननगर येथे 23 व 24 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत जिल्ह्यांतून एकूण 92 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. हि स्पर्धा 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलीच्या गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रणव वाघमारे यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

More Stories
पाचव्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत गोल डिगर्स एफसी संघाची विजयी आगेकूच
व्ही.व्ही. नातू स्मृती योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत केतकी थिटे, आध्या शाइन, नाझरीन फरझा, कनिष्क बिजार्निया यांची आगेकूच
व्ही.व्ही. नातू स्मृती योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत श्रेया भोसले, सारा साळुंके, तामिळनाडूच्या हरिणी राजा यांचे विजय