संभाजीनगर, दि.3 नोव्हेंबर 2023: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात हृतिक कटकम याने, तर मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे यांनी विजेतेपद पटकावले. तर, दुहेरीत छत्रपती संभाजीनगरच्या व्रंदिका राजपूत व दिया अग्रवाल यांना तर, फजल अली मीर व प्रकाश सरन यांनी विजेतेपद संपादन केले.
एन्ड्युरंस टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित हृतिक कटकमने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दुसऱ्या मानांकित आयुश पुजारीचा 6-4, 6-2 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकवला. दुहेरीत अंतिम लढतीत फजल अली मीर व प्रकाश सरन यांनी वरद पोळ व आयुश पुजारी या अव्वल मानांकित जोडीचा 6-1, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
मुलींच्या गटात एकेरीत अव्वल मानांकित सोलापूरच्या पार्थसारथी मुंढेने दुसऱ्या मानांकित छत्रपती संभाजीनगरच्या वृंदिका राजपूतचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. दुहेरीत अंतिम फेरीत मुलींच्या गटात दिया अग्रवाल व व्रंदिका राजपूत यांनी पार्थसारथी मुंढे व अव्यक्ता रायवरपू या जोडीचा 4-6, 6-2, 10-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण उषाजी अग्रवाल, एन्ड्युरंस ग्रुपच्या व स्पर्धा संचालिका वर्षा जैन, व्हीटीसीच्या प्राचार्य जेनिफर डिसिल्वा, होप फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी इयान कोरीरा, ट्रस्टी जॉइस कोरिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ सुपरवायझर सेजल केनिया, सेंटर हेड आशुतोष मिश्रा, मुख्य प्रशिक्षक प्रविण प्रसाद आणि मुख्य रेफ्री प्रविण गायसमुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: एकेरी: मुले: अंतिम फेरी: मुख्य ड्रॉ:
हृतिक कटकम(भारत)[1]वि.वि.आयुश पुजारी(भारत)[2] 6-4, 6-2;
मुली: पार्थसारथी मुंढे (भारत)[1]वि.वि.व्रंदिका राजपूत(भारत)[2] 6-2, 6-1.
दुहेरी: उपांत्य फेरी: मुले:
वरद पोळ (भारत)/आयुश पुजारी(भारत)[1]वि.वि.आदित्य आचार्य(भारत)/ क्रिशांक जोशी(भारत)6-3, 6-2;
फजल अली मीर (भारत)/ प्रकाश सरन(भारत)वि.वि.हृतिक कटकम(भारत)/ शिवतेज शिरफ़ुले (भारत)6-3, 6-3;
अंतिम फेरी: फजल अली मीर (भारत)/ प्रकाश सरन(भारत)वि.वि.वरद पोळ (भारत)/आयुश पुजारी(भारत)[1]6-1, 6-4;
मुली: उपांत्य फेरी:
पार्थसारथी मुंढे(भारत)/अव्यक्ता रायवरपू (अमेरिका)वि.वि.मेहा पाटील (भारत)/ रिद्धी शिंदे(भारत)6-4, 6-1;
दिया अग्रवाल (भारत) /व्रंदिका राजपूत (भारत)वि.वि.ईश्वरी मार्कंडे (भारत)/संयुक्ता पगारे (भारत) 6-2, 6-3;
अंतिम फेरी: दिया अग्रवाल (भारत)/व्रंदिका राजपूत (भारत)वि.वि.पार्थसारथी मुंढे(भारत) /अव्यक्ता रायवरपू (अमेरिका) 4-6, 6-2, 10-4.

More Stories
पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा; बीसीसीआय मानकांनुसार देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कीर्तना रागिनेनी, नाव्या शर्मा, अव्यक्ता रायावरपू, नमित भाटिया, सक्षम भन्साळी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत रिशीता यादव हिला दुहेरी मुकुटाची संधी