पुणे, ४ डिसेंबर २०२५: पुणे शहर वाहतूक विभागाने कात्रज बाह्यवळण मार्गावरील वाहनांच्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज दरम्यान कमाल वेगमर्यादा ४० किमी प्रतितास निश्चित केली आहे. ही मर्यादा अग्निशमन, पोलीस व रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांसाठी बंधनकारक असेल.
या आदेशाचे पालन मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१)(२)(बी), ११६(४) व ११७ अंतर्गत पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी निश्चित केले असून, हे आदेश गुरुवार (ता. ४) पासून लागू करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या सर्व वेगमर्यादेबाबत निर्गमित आदेश रद्द करण्यात आले आहेत.
वाहनचालकांनी आपल्या वाहनांचे स्पीडोमीटर नियमित तपासणे, रस्त्यावर लावलेली वेगमर्यादा बोर्ड व चिन्हे याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध CCTV व स्पीड गन प्रणालीद्वारे कठोर कारवाई केली जाईल, असे पुणे शहर वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.
वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलीस व वाहतूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

More Stories
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : जागतिक सायकलपटूंसाठी पुण्याचा उत्साहवर्धक अनुभव
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: ढोल-ताशे, शिवगर्जना आणि सेल्फी, प्रोलॉग रेसमध्ये पुणेकरांचा रंगारंग स्वागत
यंदाचे ‘एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन’ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना समर्पित