सदाशिव पेठ, २२ जानेवारी २०२४: सदाशिव पेठ येथील कुमठेकर रस्त्यावर आज दुपारी एक आगीची घटना घडली.ही घटना दुपारी साधारण १:३९ वाजता अण्णाभाऊ साठे शाळेसमोरील एका सदनिकेत घडली. आग लागल्याची माहिती मिळताच कसबा अग्निशाम केंद्राकडून, जनता अग्निशमन केंद्राकडून व मुख्यालयातून एक वॉटर टँकर रवाना करण्यात आला.
घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी ४ मजल्याच्या इमारतीत दुसरया मजल्यावर एका सदनिकेत आग लागल्याचे पाहताच जवानांनी वर सदनिकेत प्रवेश करुन आगीवर पाण्याचा मारा सुरू केला व त्याचवेळी घरामध्ये कोणी आहे का याचीखात्री केली. सुमारे पंधरा मिनिटात जवानांनी आग आटोक्यात आणत पुढील धोका दुर केला.
घरामधील २ वापर करत असलेले व इतर ३ रिकामे असलेले घरगुती सिलेंडर जवानांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविले. सदर आगीमध्ये कोणी ही जखमी झाले नसून घरातील बॅटरी, इनवर्टर, वायरिंग, लाकडी कपाट, फर्निचर, गादी व इतर गृहपयोगी साहित्य पुर्ण जळाले आहे.
सदर कामगिरीत वाहनचालक अनिकेत ओवाळ, ओंकार साखरे, प्रसाद शिंदे, तांडेल संजय गायकवाड व फायरमन निलेश माने, शुभम देशमुख, आदित्य परदेशी, सागर इंगळे यांनी सहभाग घेतला.

More Stories
पुणे महापालिकेचे सभागृहात टाकणार कात
पुण्यात गॅस दाहिन्या सुरूच राहणार
पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन