पुणे, 02 फेब्रुवारी 2023: पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदाच्या भरतीमध्ये माजी सैनिकांसाठी २६ जागा राखीव असून पात्र माजी सैनिकांनी या रिक्त पदांसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.
महानगरपालिकेकडील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात ९ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत मागील अनुशेषाच्या १३ आणि सध्याच्या जाहिरातीतील १३ जागा अशा २६ जागांचा समावेश आहे. https://www.pmc.gov.in/ या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या टॅब मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

More Stories
‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनातून युवाशक्तीने चेतवली देशभक्तीची ज्योत
राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी सीओईपीमध्ये एबीव्हीपी-काँग्रेसमध्ये राडा
सूसमधील कचरा प्रकल्पाचे स्थलांतर नाहीच, प्रशासनाची भूमिका