सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत बास्केटबॉल लीग स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीत सेंट व्हिन्सेंट अ संघाने फादर एग्नेल संघाचा 15-7 असा पराभव केला. विजयी संघाकडून साई शिंदे(6गुण), विहान बलाल(6गुण), पियुष मानकरी(3गुण)यांनी सुरेख कामगिरी केली. सेंट व्हिन्सेंट अ संघाने 7 सामन्यात 7 विजय, 21 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. तर, लॉयला स्कुल संघाने 7 सामन्यात 5विजय, 2पराभव, 15गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. लॉयला स्कुल संघाने अखेरच्या लढतीत सेंट पॅट्रिक्स संघाचा 16-0 असा एकतर्फी पराभव केला.
सेंट व्हिन्सेंट अ: 15 (साई शिंदे 6, विहान बलाल 6, पियुष मानकरी 3)वि.वि.फादर एग्नेल: 7 (अरिहंत शिंदे 6, रझा सय्यद 1);
लॉयला स्कुल: 16(नीव शिंदे 2, अहान बी 2, समेर एस. 2, राम के 6, श्रेयन 4)वि.वि.सेंट पॅट्रिक्स: 0;
सेंट व्हिन्सेंट ब: 19 (निशान जाधव 8, वरद देसाई 6, दरेन डिसूझा 3, श्लोक झंकार 2)वि.वि.जेएन पेटिट: 5 (मोक्ष अग्रवाल 2, सोहम जगताप 3).

More Stories
पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स क्रिकेट अकादमी, क्लब ऑफ महाराष्ट्र संघांचा दुसरा विजय
पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 409 खेळाडू सहभागी
पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत क्लब ऑफ महाराष्ट्र, ट्रिनिटी, आर्यन्स क्रिकेट अकादमी, ॲबिशियस, पीबीसीए संघांची विजयी सलामी