पुणे, 22 मार्च 2024: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए-केपीआयटी- आयकॉन 8,10, 12 व 14 वर्षाखालील ब्रॉन्झ सिरिज टेनिस 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 23 ते 25 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे.
पीएमडीटीए मानांकन योनराईज टेनिस अकादमी करंडक 12 व 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धा पाषाण सुस रोड येथे योनराईज टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर तर, पीएमडीटीए मानांकन मिलिंद मारणे टेनिस अकादमी 8 व 10वर्षाखालील टेनिस स्पर्धा द पुना वेस्टर्न क्लब टेनिस कोर्ट, भूगाव या ठिकाणी पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.

More Stories
२०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघात महाराष्ट्राच्या ऋतुजा पिसाळची निवड
Pune: मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी
पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत अभिजीत गुप्ता याला विजेतेपदाचा मान