पुणे, 06 एप्रिल 2024: सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत महिला व बालविकास विभागामार्फत दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा पुणे विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही, अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे उप आयुक्त संजय माने यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचार संहिता १६ मार्च ते ६ जून या कालावधीत घोषित केली आहे. या आचारसंहिता कालावधीत पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने एप्रिल व मे महिन्याचा विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नसल्याचे श्री. माने यांनी कळविले आहे.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन