January 17, 2026

भाजपचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे, 06 एप्रिल 2024ः भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन शनिवारी साजरा करण्यात आला. पक्षाच्या माजी अध्यक्षांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याबद्दल कृतज्ज्ञता व्यक्त करण्यात आली.

भाजप शहर कार्यालयामध्ये शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता ध्वजवंदन कार्यक्रम झाला. शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. खासदार प्रा.मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापुरकर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर घाटे यांनी पक्षाच्या माजी शहराध्यक्षांच्या भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.विश्‍वास गांगुर्डे, प्रदीप रावत, योगेश गोगावले, विजय काळे, दिलीप नगरकर, विकास मठकरी यांची भेट घेण्यात आली