पुणे, 12 एप्रिल 2024: मंदार वाकणकर टेनिस अकादमीव गोल्ड लिफ यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली टीपीएल – पीएमडीटीए 16 व 18 वर्षांखालील टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 13 व 14 एप्रिल 2024 या कालावधीत एसपी महाविद्यालयाच्या टेनिस कोर्टवर होणार आहे.
स्पर्धेत शहरातून 50 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून हि स्पर्धा 16 व 18 वर्षांखालील एकेरी व दुहेरी गटात होणार आहे. स्पर्धेत स्वर्णिम येवलेकर, अथर्व येलभर, सनत कडले, वैष्णव रानवडे, काव्या देशमुख, अनुष्का महामुनी, श्रीया रांजळकर हे मानांकित खेळाडू झुंजणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा संचालक मंदार वाकणकर यांनी दिली.

More Stories
२०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघात महाराष्ट्राच्या ऋतुजा पिसाळची निवड
Pune: मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी
पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत अभिजीत गुप्ता याला विजेतेपदाचा मान