पुणे,१५ आॅक्टोबर २०२४ : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा तयार करण्याचे काम हाती घेतले असून, त्यासाठी विविध उपसमित्याही गठित केल्या आहेत. या जाहीरनाम्यात मतदारांच्या सूचनांचा समावेश केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाबाबत सूचना पक्षाकडे सादर कराव्यात असे आवाहन महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस पुनीत जोशी आदी उपस्थित होते.
सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारांनी केंद्रात आणि राज्यात अंमलबजावणीच्या आघाडीवर उल्लेखनीय यश मिळविले आहे. जाहीरनाम्यात केवळ आश्वासने असतात. संकल्प पत्र ही पुढची पायरी होती. आमच्या संकल्प पत्राची कशा प्रकारे अंमलबजावणी करायची याचा आराखडा तयार केला जात आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ३० सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. त्यात १८ उपसमिती आहेत. या उपसमितीच्या माध्यमातून उज्ज्वल निकम यांच्याकडे कायदा – सुव्यवस्था, माधव भांडारी यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन, पाशा पटेल यांच्याकडे शेती आणि शेतकरी, स्मिता कोल्हे यांच्याकडे महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण, दिलीप कांबळे यांच्याकडे सामाजिक न्याय, श्रीपाद ढेकणे यांच्याकडे शिक्षण आदी विषयांवर काम सुरु आहे.
भाजपच्या या जाहीरनाम्यात कोणत्या गोष्टीचा समावेश असला पाहिजे याबाबत मतदारांनी त्यांच्या सूचना पाठवाव्यात व्यवहार्य सूचनांचा समावेश केला जाईल. दिवाळीनंतर हा जाहीरनामा प्रकाशित केला जाणार आहे,असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
मतदारांना त्यांच्या सूचना visionformaharashtra@gmail.com या इमेल आडीवर किंवा 9004617157 या वॉट्सॲप क्रमांकावर पाठवता येणार आहेत.

More Stories
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Pune: मेट्रो सफर, रेल्वे म्युझियम पाहून बालगोपाल हरखले
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना