पुणे, ३ एप्रिल २०२५: पूना क्लब कामगार युनियन आणि पूना क्लब व्यवस्थापण यांच्यामध्ये आर्थिक वर्ष 2025 ते 2028 करिता वेतन करार मोठ्या उत्सहात पार पडला. पूना क्लबच्या 140 वर्ष्याच्या इतिहासात पहिली वेळ हा करार दिनांक 01 तारखेला पार पडला मागील करार दिनांक 31.03.2025 ला संपुष्टात आला आणि 01 .04.2025 ला नवीन करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यामुळें सर्व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नवीन करार यशस्वी करण्यासाठी पूना क्लबचे अध्यक्ष – गौरव गढोक,उपाध्यक्ष – इंद्रनील मुजगुले , स्टाफिंग चेअरमन – मनजीत राजपाल साहेब ,हाऊस चेअरमन – शशांक हळबे, केटरिंग चेअरमन – मालव्या मॅडम व इतर कमिटी सभासद ,पूना क्लबचे सी .ई.ओ सेक्रेटरी लेफ्टनंट कर्नल अशोक सरकार (रिटायर्ड) ,पूना क्लब चे लीगल ऍडव्हायजर आदित्य जोशी यांचे खूप मोठे योगदान आहे.
या करारामध्ये पूना क्लब कामगार युनियन तर्फे युनियनचे अध्यक्ष -सचिन धोंगडे,उपाध्यक्ष – विलास पार्टे, सचिव – सिद्धेश्वर ओव्हाळ ,खजिनदार – प्रवीण देवघन ,संचालक – दिपक कुचेकर ,संचालक – राहुल कांबळे ,संचालक – किरण शिंदे तसेच युनियनचे सल्लागार – शिवाजीराव खटकाळे व वकिल – गौरव पोळ साहेब यांचा मोलाचा वाटा आहे.
पूना क्लब युनियनच्या वतीने पूना क्लब व्यवस्थापनाचे खूप खुप अभिनंदन व आभार मानण्यात आले.

More Stories
सारसबाग बंद ठेवण्यावरून पुन्हा वाद; गेल्या वर्षी धार्मिक कारण, यंदा सुरक्षेचा मुद्दा
Pune: एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा
कचरा प्रक्रिया प्रकल्प ठप्प; शहरात ३०० ते ४०० टन अतिरिक्त कचऱ्याची समस्या